काल तिचा एकेक चौकार तिला ट्रोल करणार्या भक्तडुक्कर पिलावळीच्या सणसणीत मुस्काडात लगावल्यासारखा बसत होता. तिला जवळजवळ आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला होता हराम्यांनी. दुसर्याचं करीयर बरबाद होण्यात आनंद मानणं हे त्यांच्या पिढीजात नासक्या रक्तातच आहे.
काही महिन्यांपूर्वी जेमिमाच्या वडिलांवर बेसलेस खोटे आरोप करून या पिलावळीनं तिचं खार जिमखाना सदस्यत्व रद्द करायला लावलं. ‘ती ख्रिश्चन आहे’ हा जणू तिचा दोष आहे, अशी वागणूक तिला दिली गेली. तिचं करियर संपवण्याचा घाट घातला.
या नालायक जमातीच्या जिवघेण्या ट्रोलींगनं ती खचली. ‘गँगरेप’सारख्या धमक्यांनी ती डिप्रेशनमध्ये गेली. तिनं क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. तिचे कुटूंबीय आणि कोच तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. मानसोपचार तज्ञाची मदत घेऊन तिला पुन्हा उभं केलं.
काल तिनं अक्षरश: डोळे दिपवणारा खेळ करून आपल्या देशाला वर्ल्डकप फायनलची जवळजवळ बंद झालेली दारं उघडी करून दिली ! सेमीफायनलला ३३८ धावांचा डोंगर पार करणं खायचं काम नव्हतं. जेमिमानं नाबाद शतक करून सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला लांब फेकून दिलं…
त्याचबरोबर भक्ताडांच्या ट्रोलिंगलाही सातासमूद्रापल्याड भिरकावून दिलं ! तिची ही खेळी पुरूष आणि स्त्रियांच्या वर्ल्ड कप नाॅकआऊट फेरीमधली आजवरची रेकाॅर्ड ब्रेक खेळी ठरली आहे. एवढंच नाही, तर जगभरातल्या महिला क्रिकेटसाठी ही ऐतिहासिक खेळी आहे.
जेमिमा, आज संपुर्ण भारत देशाला आणि प्रत्येक खर्याखुर्या भारतीयाला तुझा अभिमान आहे. तू आमच्या देशाची शान आहेस. आमचा देश प्रत्येक देशवासियाच्या धर्माचा, जातीचा, पंथाचा, वंशाचा आदर करणारा आहे.
संविधानानं दिलेली समता आणि बंधुता जपणारा आहे. धर्माचा आणि देशाचा ठेका घेऊन जबरदस्ती करू पहाणार्या भिकारड्यांना तू आज खर्या अर्थानं दाखवून दिलंस की,”किसी के बाप का हिंदोस्तान थोडी ही है?”


