दारु पिऊनच मरण पावला.. — झालं पुन्हा एक कुटुंब उद्ध्वस्त..

ऋषी सहारे

संपादक

आरमोरी-

दारूबंदी जिल्ह्यात एवढी दारु मिळते की अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. जनमानसात बोंब सुरू आहे दारू पिऊनच मेला तरी पण सबंधित विभाग एवढं सुस्त का? दारू विक्री संबंधाने मोठ्या प्रमाणावर बातम्या प्रकाशित होत आहेत आणि डॉन कोण हे ही माहीत आहे तरी पण कारवाई शून्य का? अशातच तालुक्यातील वैरागड येथून जवळच असलेल्या सुकाळा येथील इसम वैरागड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मेढेबोडी येथे पांदण रस्त्याने पायी आला होता. नंतर तो गावाकडे परत जाताना मेढेबोडी येथील शेतात आज गुरुवारी सकाळी ११ सुमारात मृताअवस्थेत आढळून आला.

         अण्णा देवराव वटी (५५) रा. सुकाळा असे मृत व्यक्तीचे नाव असून तो गुरुवारी सकाळी सुकाड्यावरून मेंढेबोडी येथे दारू पिण्यासाठी मेंढेबोडी सुकाळा दरम्यान असलेल्या पांदण रस्त्याने पायी दारू पिण्यासाठी आला होता असे लोकांचे म्हणणे आहे.

          त्याला नंतर त्याच रस्त्याने सुकाळा येथे आपल्या गावी परत जाताना रस्त्यादरम्यान असलेल्या देवानंद कोटांगले यांच्या शेतात अति दारू पिल्याने तो त्याच ठिकाणी पडला असावा व मृत्युमुखी पावला अशी चर्चा आहे.

           याबाबत आरमोरी येथील पोलिसांना तक्रार नोंदणी असून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत मृतक हा परराज्यात मजूरीसाठी गेला होता. दोन दिवसा पूर्वी तो स्वगावी परतला त्याच्या पश्चात पत्नी व बराच मोठा परिवार आहे.