बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आली.
पंचक्रोशीतील नरसिंहपुर , गिरवी, टणु, ओझरे, गोंदी, सराटी, गणेशवाडी, लुमेवाडी, लिंबुडी,सह सर्व भागात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
संचालक श्रीकांत बोडके, सरपंच प्रतिनिधी सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, पोलीस पाटील वर्धमान बोडके, बबन बोडके देविदास बोडके,सह सर्व ग्रामस्थांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी पिंपरी ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील तसेच सर्व पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ,प्रवीण बोडके,राहुल बोडके,पप्पू बोडके,राजेंद्र लावंड, बाळासाहेब घाडगे,शंकर बोडके, शहाजीआण्णा बोडके, दिलीप ठोकळे, अनिल गायकवाड,जगुमामा मोहिते,जबर शेख, हनुमंत पडळकर, युवराज गायकवाड, पोपट सुतार, शंकर रणदिवे, मयूर चौगुले,भाऊ रणदिवे,सतीश सूर्यवंशी,अशोक रजपूत, विकास नगरे,बापू सूर्यवंशी,संजय नरूटे, दुर्योधन शेंडगे,नानासो बोडके, आजय बोडुके, दशरथ कांबळे, सतिश बोडके, सह आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.



