Home देशविदेश नागार्जुन,महायान पंथाला पुनरुज्जीवन देऊन जगभर पसरवणारे… — भाग – 003

नागार्जुन,महायान पंथाला पुनरुज्जीवन देऊन जगभर पसरवणारे… — भाग – 003

      नागर्जूनांना समजून घेण्यासाठी त्रिविध मार्ग अनुसरला पाहिजे.

      सर्व प्रथम,त्यांच्या बद्धल असलेल्या बहुपेडी परंपरा एकमेकीं पासून अलग केल्या पाहिजेत.

     काही वेळा भिन्न काळातील व प्रदेश्या तील आणि नागार्जुन यांची निर्हेतुकपने गल्ल त करण्यात आली आहे तर काही वेळा हेतुपुरस्सर नागार्जूनांचे व्यक्तित्व त्या इतर व्यक्ती मध्ये विलीन करण्यात आले आहे.

हे घोटाळे दूर केले पाहिजेत.

    काही वेळा प्रस्तुत आणि अधिक विश्वसनिय अश्या वृत्तांता मधून देखील त्यांच्या व्यक्तित्वाला धूसर बनविणाऱ्या पुराण कथांची व दंतकथांची आवरणे आढळतात; ती काढली पाहिजेत.

     पहिल्या टप्प्यावर एव्हढे केले असता,आपण नागार्जुनांच्या बाबतीत एका किमान सापेक्ष अश्या निसश्चित ते पर्यंत किंवा एका किमान वाजवी अश्या संभाव्यते पर्यंत पोहोचू शकू.

     दुसरी गोष्ट म्हणजे आपण ग्रहणशील बनून आपल्या अंतर्यामी नागार्जुनाच्या एका प्रतिमेला साकार होऊ द्यावे – एखादा आर्यदेव,किंवा एखादा कुमार जीव,एखादा चीत्सन्ग, किंवा एखादा चन्द्रकिर्ती, एखादा बुस्टोन, किंवा एखादा त्सान – खा – पा यांना त्यांची जी प्रतिमा भावली होती,तशिच ही प्रतिमा असावी. एकीकडे अश्या प्रकारची अंतरदृष्टी आणि दुसरीकडे परंपराच्या चिकित्सक विश्लेषणाचे फळ, या दोहोंच्या मिलाफातुन आपल्याला नागार्जूनांचे काहीसे समाधान कारक चित्र मिळू शकेल आणि त्यांचा इतका अपरिमित प्रभाव का पडला,याचा खुलासा होण्यासही त्यामुळे मदत होईल.

       अशारितीने त्यांच्या वास्तविक ऐतिहासिक वास्तवाला सामोरे जाऊन त्यांचे समकालीन बनण्याची स्थिती जर आपण स्वीकारली,तर ते आपल्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरतील आणि आपल्या ला त्यांचा योग्य संदर्भ लागू शकेल.

      तिसरी गोष्ट अशी :- नागार्जुनांनी मानवी अस्तित्व,मानवी महत्वाकांक्षा आणि मानवी कर्तव्य या विषयी चे मूलभूत प्रश्न हाताळले होते.

       चिंतनशील विचाराने आणि गौतम बुद्धाच्या उपदेशानुसार नैतीक जीवन व ध्यान यांच्या द्वारे विकसित झालेल्या अंतरज्ञानाने त्यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधून काढली होती.

 तसेच या उत्तरांना अनुसरून त्यांनी आपले आचरणही घडविले होते.

          शिवाय वेगवेगळ्या देशामध्ये व संस्कृती मध्ये जन्माला आलेल्या वेगवेगळ्या पिढ्यातील अत्यन्त विवेकी व संवेदनशील अश्या काही व्यक्तींच्या दृष्टीने नागार्जुनांचा पंथ आणि अनुभव हा एक निःशंक करणारा आदर्श बनला होता.म्हणून त्यांचा पंथ व अनुभव यांचे आकलन झाले असता, आपल्याला आपल्या स्वतःच्या परिस्थिती चे स्पष्टीकरण मिळू शकेल.

तसेच या आकलना मुळे मूलभूत प्रश्नांची संभाव्य उत्तरे ही सुचवली जातील. 

हा त्रिविध मार्ग होय.

      एकीकडे प्लूटो वा पास्कल ऑगस्टाइन व ऑक्वीनस,शंकराचार्य किवा रामानुज या सारख्या महान विचारवंतांनी मूलभूत प्रश्नाविषयी सखोल चिंतन केलेले असते.

       तर दुसरीकडे आपल्याला आपल्या स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात आणि त्यासाठी आपल्याला कोणत्या दिशेने जावे लागेल याचा थोड़ा बहुत अंदाज हवा असतो.

        असा अंदाज हया विचार वंताकडून आपल्याला मिळू शकतो,तो या त्रिविध मार्गानेच होय.

           मिलिंद वानखडे

रिटा,शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई.

Dt:-1 /6/2025 Sunday