तहानलेल्या पक्ष्यांना मिळणार पाणी व खाद्य.. — टायगर ग्रुप चिमूरचा स्तुत्य उपक्रम.. – विविध ठिकाणी वाटल्या पक्षी घागर..

 

चिमूर :- 

          दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळणे कठीण होत आहे. पाण्याअभावी हजारो पक्षी मृत्युमुखी पडत आहे. या पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी चिमूर येथील टायगर ग्रुप पक्ष्यांना पाणी पाजण्याचे अमूल्य कार्य करीत आहे. आज महाराष्ट्र दीन व कामगार दिनानिमित्त पैलवान वस्ताद जालिंदर जाधव. टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष पैलवान तानाजी जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष सूर्या आडबले यांचे मार्गदरशनाखाली पाणी घागर व खाद्य वाटप करण्यात आले.

       मागील पंधरा वर्षापासून गावात व परिसरात पक्षी घागर ही संकल्पना समोर आणली आहे. यानुसार सर्वात आधी त्यांनी चिमूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय,नेहरू चौक,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॉलेज चौक. संविधान. व विविध कॉलोनी मधे पक्षी घागर वाटप केल्या. 

      या पक्षी घागर गावात वाटण्यात येत आहेत.एवढेच नाहीतर घरातील सदस्यांना पक्षी घागरमध्ये पाणी टाकून पक्ष्यांना पाणी पाजण्याचे पुण्यकर्म करा, अशी विनंतीही करण्यात आली.

         या उपक्रमामुळे तहानलेल्या हजारो पक्षांना जीवदान मिळणार आहे. हे पक्षी घागर टायगर ग्रुप शहर अध्यक्ष रोहन नन्नावरे यांच्या मार्गद्शनात वाटप करण्यात आले. 

      यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते. टायगर ग्रुप शहर अध्यक्ष रोहन नन्नावरे. पवन झाडे. विशाल शेंडे. निखिल गिरी. विकास जांभूले. विशाल शिवरकर. दुर्गेश हजारे, शार्दुल पचारे. शुभम पसांरकर आदी उपस्थित होते.