Home Social तालुका आरोग्य अधिकारी मार्फत इनरव्हील क्लबचा सत्कार सोहळा…

तालुका आरोग्य अधिकारी मार्फत इनरव्हील क्लबचा सत्कार सोहळा…

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधि वर्धा

हिंगणघाट :- जगभरात शायरोगाचे संसर्ग होण्याचे प्रमाण खुप अधिक असुन जागतिक पातळीवर क्षयरोग होण्याचे प्रमाण हे भारतात सर्वाधिक असुन या क्षयरोगाचे संपूर्ण नायनाट करण्याच्या दृष्टिकोणातुन भारत सरकार व केंद्र सरकार व केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात.

          त्या उद्देशाने जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून हिंगणघाट शहरातील 100 टी बी रुग्णाला इनर व्हील क्लबने सहामहिन्या करिता दतक घेऊन त्याना पोषक आहार दिल्या बद्दल तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम मार्फत गौरव सत्कार सोहळा दि. 26/3/2025/ रोजी मां शेरावाली सभागृह हींगनघाट येथे पार पाडण्यात आला.

          कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.राज पराडकर सर तर प्रमुख अथिति म्हणून गट विकास अधिकारी श्री. रोहित शिंदे सर,प्रशासकीय अधिकारी उगे मुग मैडम, जिल्हा क्षयरोग अधिकारी श्री.हेमंत पाटिल सर, तालुका आरोग्य अधिकारी श्री.प्रभाकर नाईक, उप जिल्हा रुग्णालय येथिल वैद्यकिय अधीक्षक डॉ.प्रवीणा मिसार मैडम उपस्थित होते.

         क्षयरोग वरील उपचार प्रक्रिया पूर्ण करने या आजारापासुन पूर्ण बरे करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.राज पराडकर सर यांनी व्यक्त केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रभाकर नाईक यांनी केले.राष्ट्रीय क्षय रोगदुरीकरण कार्यक्रमाची माहिती वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक श्री.मनोज वर्भे श्री.पुरुषोत्तम नांदूरकर यांनी दिली.

          100 क्षय रुग्णांना पोषक आहार दिल्या बद्दल ईंनर व्हील क्लबचे अध्यक्ष डॉ.रूपल कोठारी मैडम व क्लब चे इतर सभासदचा महात्मा गांधी यांच्या स्मृति चिन्ह व प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात आला.

           या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सचिन खदार यांनी केले आणि आभार प्रदर्शन पूनम भुसारी मैडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.मनोज वरभे,पुरुषोत्तम नांदुरकर,श्री. बहादे,कदम, कु.पद्मा खरसान मैडम,नितेश पंच वते,निखिल हेडाऊ,रितेश कांबड़े,उमेश मेश्राम,विनोद भगत,प्रशांत जंगथे,पंकज निमस डकर,हितेंद्र गुरुग यांनी अथक परिश्रम केले.