Home Maharashtra साकोलीत”तलाव चौपाटी”वर अश्लीलता व नशेखोरांचे सावट… — प्रत्यक्ष फोटो आले “प्रेस...

साकोलीत”तलाव चौपाटी”वर अश्लीलता व नशेखोरांचे सावट… — प्रत्यक्ष फोटो आले “प्रेस संपादक जिल्हाध्यक्षांकडे… — इतरत्र दारूच्या शिश्याही सापडल्या… — पोलीस ठाणे समोरील भयंकर प्रकाराने महिलेची मान शरमेने खाली…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

भंडारा : साकोली शहरातील तलाव सौंदर्य करून हे स्थळ एक “जलसागर चौपाटी” निर्माण होत आहे. याला आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नांतून कोटींच्या निधीत एक मुख्य सौंदर्यकृत साकोली शहरातील पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार. व या स्थळावरच सध्या अश्लील कृत्यांना वाव मिळाला आहे. तर हे स्थळ मद्यपींचे जणू मिनी बार बगिचा बनले आहे.

           याच्या विरूद्ध दिशेने पोलीस ठाणे असून या गंभीर व संतापजनक प्रकरणी सायंकाळी येथून फिरायला जाणा-या महिला जनतेला मात्र यामुळे शरमेने मान खाली घालून चालावे लागत आहे. येथील लावलेल्या महाग झाडांची नासधूस केली जात आहे. या गंभीर प्रकाराचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी एक ॲडव्होकेट, एक नामांकित वैद्यकीय अधिकारी व एक जागृत युवा सामाजिक कार्यकर्त्याने नगरपरिषद व पोलीस प्रशासनाकडे केली आहे. 

           मुख्य शहर साकोलीचा प्राचीन तलाव याला तिन्ही बाजूंनी सौंदर्यात भर घालून पथचलन चौपाटीत हिरवेगार बगिचा निर्माण होत आहे. पण काही अज्ञात समाजकंटक या गडकुंभली रोड ते एकोडी रोड चौक व नविन पंचायत समिती परीसरात येथे रात्री बसून दारू ढोसतात. बाटल्या व टाकाऊ पदार्थ तेथेच फेकतात.

          या स्थळी काही गांजा ओढणारी तरूण मुले महाविद्यालयीन तरुणींना येथे आणून नको ते दिवसाढवळ्या अश्लील कृत्ये करतानाची छायाचित्रे एका जागृत सामाजिक कार्यकर्त्यांने “प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ” भंडारा जिल्हा अध्यक्षांकडे पाठवित हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून द्या असे सांगितले. कारण येथून एकोडी रोड – गडकुंभली रोड व दक्षिण दिशेला नविन पंचायत समिती पर्यंत लागलेल्या निसर्ग बगिचा मार्ग पथ टाईल्सवर दररोज सायंकाळी महिला पुरुष जनता फिरायला जातात. 

       या संतापजनक प्रकाराने महिला आपली मान शरमेने खाली घालून चालतात. जिकडे तिकडे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो व तो खच दररोज एक स्वच्छता कर्मचारी जमा करून हा परीसर स्वच्छ ठेवतो. पण दूस-या दिवशी तोच संतापजनक प्रकार पहावयास मिळतो. काही दिवसांपूर्वी येथे अतिक्रमण जागा धरण्याहून डोकेफोड मारहाण झाली होती. परीसरात स्वच्छता गृह जवळ काही अल्पवयीन मुलींचा वावर असतो व रात्री काही अंमली पदार्थांचे सेवन करून तरूण येथे येतात व रात्री बेरात्री येथे अश्लील कृत्यातील धंद्यांना पाठबळ मिळाले आहे. 

            येथील न्यायालयातील एक प्रतिष्ठित अधिवक्ता, एक माजी वैद्यकीय अधिकारी व एक युवा जागरूक सामाजिक कार्यकर्ता यांनी नगरपरिषद आणि साकोली पोलीस प्रशासनाकडे ही मागणी केली आहे कि, येथील हा संतापजनक प्रकारावर तातडीने आळा घाला. 

          येथील सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता श्री. मटाले यांनी येथील झालेल्या वृक्षतोड व नासधूस प्रकरणी तक्रार दाखल करावी आणि हे तलाव सौंदर्याचे थांबलेले काम त्वरित सुरू करावे. येथे सीसीटीव्ही कॅमेरे लाऊन रात्रीला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी मागणी करण्यात आली आहे.