Home Crime आरमोरी पोलिसांची धडक कारवाई : स्विफ्ट कारमधून ₹5.20 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त,...

आरमोरी पोलिसांची धडक कारवाई : स्विफ्ट कारमधून ₹5.20 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त, ब्रह्मपुरीचा इसम अटकेत… 

ऋषी सहारे 

   संपादक 

आरमोरी : अवैध दारू वाहतुकीविरुद्ध आरमोरी पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ₹5.20 लाख किमतीचा दारूसाठा आणि स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहे. ब्रह्मपुरी येथील एका इसमाला अटक करण्यात आली आहे.

        पोलीस निरीक्षक कैलास गवते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जुना बस स्टँड, आरमोरी येथून 500 मीटर पश्चिमेस नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान ब्रह्मपुरी रोडकडून येणारी मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर MH-40/Y-6149 संशयित वाटल्याने तपासणी केली असता वाहनातून मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली.

जप्त मुद्देमाल…

1.लंडन पिल्सनर बिअर 500ML – 120 टीन, किंमत ₹36,000

2. रॉयल स्टॅग विदेशी मद्य 180ML – 240 निपा, किंमत ₹84,000  

3. मारुती स्विफ्ट डिझायर कार – किंमत ₹4,00,000

एकूण मुद्देमाल : ₹5,20,000

       या प्रकरणी प्रफुल प्रकाश घरटे, वय 32, रा. हनुमान नगर, ब्रह्मपुरी याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन आरमोरी येथे अप. क्र. 219/2026, कलम 65(अ), 98(2) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि. नरेश सहारे यांच्या पथकाने केली.