राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा तालुक्यात सध्या एका लगतच्या जिल्ह्यातील यू-ट्यूब चॅनेलच्या बातम्यांची चांगलीच चर्चा रंगत असल्याचे चित्र आहे. विशेषतः ‘खमंग मसाला’ शैलीतील बातम्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे स्थानिक स्तरावरही विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.जनमानसात दबक्या आवाजात एक प्रश्न विचारला जात आहे – “बाहेरच्या ‘दलालाला ‘ मसाला मिळाला, मग स्थानिकांना का नाही?” काही नागरिकांच्या मते, तालुक्यातील अनेक घडामोडी, स्थानिक प्रश्न आणि चर्चेचे विषय बाहेच्यां कडून अधिक गावंढळ शैलीत ठळकपणे मांडले जात आहेत. त्यामुळे स्थानिकांची भूमिका आणि सक्रियता यावरही चर्चा सुरू झाली आहे.
तर दुसरीकडे, काही जाणकारांचे मत आहे की बातमीमध्ये वेग, सादरीकरण आणि विषयांची मांडणी जरी का गावंढळ स्वरुपाची असेल परंतु वस्तुस्थिती महत्त्वाची ठरत असून प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीमुळे डिजिटल माध्यमांना अधिक प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, या चर्चांमध्ये कोणत्याही विशिष्ट माध्यमावर आरोप नसून समाज माध्यमा द्वारे फालोवर्स कसे वाढवायचे हा पोहोचलेला “संदेश ” नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे असल्याचेही सांगितले जात आहे. आता स्थानिक ही या स्पर्धेत अधिक प्रभावी उपस्थिती दाखवणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.



