Home Maharashtra मनुष्य जिवनाला बरबाद करणाऱ्या,”दारु,सुगंधित तंबाखू,गुटखा,बिडी,ब्रिस्टाल,गांजा,भेसळयुक्त पदार्थावर कायम बंदी हवी….. — “मुंडे...

मनुष्य जिवनाला बरबाद करणाऱ्या,”दारु,सुगंधित तंबाखू,गुटखा,बिडी,ब्रिस्टाल,गांजा,भेसळयुक्त पदार्थावर कायम बंदी हवी….. — “मुंडे साहेब चंद्रपूर जिल्ह्याकडे वेळीच लक्ष द्यावे!…

  लक्षवेधी

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

     दारु,सुगंधित तंबाखू,गुटखा आणि बिडी – सिगारेटच्या सेवनामुळे भारत देशातील करोडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून,लाखो लोकांना जिव गमवावे लागले आहे.

       याचबरोबर दारु,सुगंधित तंबाखू,गुटखा,बिडी-सिगारेट,गांजा च्या सेवनामुळे लाखो लोक गंभीर आजारी झाले आहेत,गंभीर आजारासी झुंज देत आहेत.येणाऱ्या काळात या सर्व नशीली पदार्थाच्या सेवनामुळे करोडो नागरिक आजारग्रस्त होणार आहेत,विकलांग होणार आहेत.

        तद्वतच नशीली पदार्थाच्या सेवनामुळे मनुष्यबळाची व आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होणार आहे,म्हणजेच देशाची विपरीत हानी होणार आहे.

           यामुळे देशहिताच्या,समाजहिताच्या,मनुष्यहिताच्या दृष्टीने दारुसह सर्व नशीली पदार्थाच्या विक्रीवर कायम बंदी घातली गेली पाहिजे.आणि नशीली पदार्थाच्या विक्रीवर बंदी आणतानाच कठोर कायदा केंद्र व राज्य सरकारने तयार केला पाहिजे.

         एवढेच काय तर सदर कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे म्हणून केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने जातीने बघितले पाहिजे असे लोकमन आहे.

दारु….

       दारू (अल्कोहोल) चे सेवन शरीरासाठी अत्यंत घातक असून यामुळे यकृत खराब होतय.याचबरोबर दारु सेवनामुळे हृदयविकार होतात,तद्वतच दारु पिणाऱ्या व्यक्तींची स्मरणशक्ती कमी होतय आणि कर्करोग यांसारखे जीवघेणे आजार होतात. 

      या व्यसनामुळे मानसिक संतुलन बिघडते आणि सामाजिक व आर्थिक नुकसान होते.

         दारू प्यायल्यामुळे यकृतावर चरबी जमा होत असल्यामुळे फॅटी लिव्हर,हिपॅटायटीस आणि सिरोसिस यांसारखे गंभीर आजार होतात.ज्यामध्ये यकृताचे कार्य मंदावते.

       जास्त मद्यपानामुळे रक्तदाब वाढतो (हाय ब्लड प्रेशर) आणि हृदयाचे ठोके अनियमित होतात यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

     याचबरोबर मद्यपी व्यक्तींच्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी होते,ज्यामुळे ते इतर आजारांना लवकर बळी पडतात.

       दारूमुळे मेंदूच्या विचार करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो,स्मरणशक्ती कमी होतय.दीर्घकाळ दारू पिल्याने डिमेंशियासारखे आजार होऊन व्यक्ती आपली स्मरणशक्ती दारु पिणारे गमावू शकतात.

       काही वेळापुरता आनंद देणारी दारू कालांतराने व्यक्तीला तीव्र नैराश्याकडे ढकलते,सामाजिक आणि आर्थिक नुकसान होते,कौटुंबिक कलह वाढतो,व्यसनाधीनतेमुळे घरातील शांतता नष्ट होते.दारूच्या आहारी गेल्याने घरातील जमापुंजी नष्ट होते.यामुळे दारु पिणारे व्यक्ती गुन्हेगारीकडे वळण्याची दाट शक्यता असते.

सुगंधित तंबाखू….

     सुगंधित तंबाखू (Scented Tobacco) हे प्रक्रियेद्वारे स्वाद आणि सुगंध (उदा.केशर,मेंथॉल,गुलाब,किंवा फळांचे अत्तर) जोडलेले तंबाखूचे उत्पादन आहे.

        कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांना कारणीभूत ठरत असल्याने महाराष्ट्र शासनाने अशा सर्व प्रकारच्या सुगंधी,स्वादिष्ट आणि चघळण्याच्या तंबाखूच्या विक्रीवर आणि साठवणुकीवर कायद्याने बंदी घातली आहे.

     अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत (FSSAI) तंबाखू आणि निकोटिनयुक्त उत्पादने मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक मानली जातात.

       बंदी असूनही चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात (विशेषतः चंद्रपूर,नागपूर भागात) परराज्यातून सुगंधित तंबाखूची तस्करी आजही सुरू आहे.

         स्थानिक पोलिस आणि अन्न सुरक्षा विभाग (FDA) अशा अवैध कारखान्यांवर सातत्याने कारवाया करून लाखोंचा मुद्देमाल जप्त करत असतात,असे दिसून येत असले तरी त्यांच्याच दुर्लक्षितपणामुळे सुगंधित तंबाखू शहरासह प्रत्येक खेड्यापाड्यात उपलब्ध असल्याची खात्री आहे.

       कारण शहरासह ग्रामीण भागात सुगंधित तंबाखूचे खर्रे बिनधास्त विकली जातात हे वास्तव आहे.

      सुगंधित तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग (Oral Cancer), श्वसनाचे आजार आणि हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

गुटखा….

       गुटखा खाण्यामुळे आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होतात.यामध्ये आढळणारे निकोटिन आणि इतर रसायने कर्करोग (Cancer),दातांचे गंभीर आजार,हृदयविकार आणि व्यसनाधीनतेस कारणीभूत ठरतात.

      गुटख्यामध्ये ७० पेक्षा जास्त कर्करोग निर्माण करणारी रसायने (Carcinogens) असतात.यामुळे मुख्यत्वे तोंड,जीभ,घसा,अन्ननलिका आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका सर्वाधिक असतो.गुटखा चघळल्यामुळे तोंडाची त्वचा कडक होते आणि तोंड उघडण्यास त्रास होतो.

         तसेच पांढरे चट्टे पडणे (Leukoplakia),हिरड्या कमकुवत होणे आणि दात किडणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

      निकोटिनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात,ज्यामुळे रक्तदाब वाढतो (Blood Pressure) आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका बळावतो.गुटख्यातील निकोटिन मेंदूवर परिणाम करते,ज्यामुळे व्यक्तीला त्याचे तीव्र व्यसन जडते. 

       व्यसन न मिळाल्यास सदर व्यक्ती चिडचिड करतो,अशा व्यक्तींची डोकेदुखी सुरू होते आणि त्यांच्यात मानसिक तणाव जाणवतो.त्यांच्या पचनसंस्थेवर परिणाम पडतो,गुटख्याच्या सेवनाने पचनक्रिया बिघडते.पोटात जळजळ होते.तसेच गुटख्यामुळे अल्सर आणि पोटाचे आजार होतात.

बिडी- सिगारेट…..

    तंबाखूजन्य पदार्थ (सिगारेट आणि बिडी) आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत आणि यामुळे कर्करोग (Cancer), श्वसनाचे आजार आणि हृदयविकार होऊ शकतात. 

कठोर कारवाई व्हावी…..

     व्यशनाधिनते अन्वये भारत देशातील नागरिकांच्या आरोग्याशी,त्यांच्या भविष्यासी जुगारासारखा खेळ खेळल्या जात आहे.

         व्यशनाधिनतेचा खेळ आयुष्याला कायम संपविणारा असल्याने,कुटुंबाची वाताहत करणारा असल्याने,कुटुंबाची आर्थिक स्थिती विस्कळीत करणारा असल्याने,कुटुंबाचे मानसिक संतुलन बिघडवणारा असल्याने,दारु,सुगंधित तंबाखू,गुटखा,बिडी-सिगारेट,गांजा,यासारख्या नशीली पदार्थावर कायम बंदी घालणे आवश्यक आहे.

          याचबरोबर मनुष्य धन वाचविण्यासाठी आणि देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी,कठोर कायदा तयार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने वेळीच पावले उचलली पाहिजेत.त्या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे.

मुंडे साहेब चंद्रपूर जिल्ह्याकडे लक्ष द्यावे……

       चंद्रपूर जिल्हातंर्गत सुगंधित तंबाखू विकला जात आहे.सुगंधित तंबाखू विकणाऱ्यांना राजकीय पाठबळ असण्याची शक्यता आहे.याचबरोबर सुस्त अधिकाऱ्यांचा सुगंधित तंबाखू विकणाऱ्यां तस्करांना आशिर्वाद असू शकतो हे नाकारता येत नाही.

         तद्वतच भेसळयुक्त पदार्थाची विक्री,बोगस औषध साठ्याची विक्री सुध्दा चंद्रपूर जिल्हातंर्गत सुरू असू शकते.

     अन्न भेसळ म्हणजे नफा मिळवण्यासाठी मूळ खाद्यपदार्थात निकृष्ट,कमी दर्जाचे किंवा विषारी घटक मिसळणे होय.भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार,यकृताचे आजार आणि कर्करोगासारखे गंभीर धोके उद्भवू शकतात.

      यामुळे तुकाराम मुंढे साहेबांनी चिमूर तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे या मताची जनता आहे.