ऋषी सहारे
संपादक
जोगीसाखरा :- भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल, जमीन आणि आदिवासी स्वाभिमानाच्या रक्षणासाठी दिलेला लढा संपूर्ण आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी आहे. अन्याय, शोषण आणि गुलामगिरीविरुद्ध त्यांनी उभारलेले आंदोलन आजही समाजाला संघर्षाची आणि स्वाभिमानाची प्रेरणा देते.
यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असून त्यांच्या आदर्शांवर चालत सामाजिक एकता, शिक्षण आणि विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.बिरसा मुंडा यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असून त्यांच्या आदर्शांवर चालत सामाजिक एकता, शिक्षण आणि विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांनी केले
आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे आदिवासी गोंड समाज यांच्या वतीने आदिवासी जननायक, महान स्वातंत्र्यसेनानी तथा क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम बोलत होते.
यावेळी आदिवासी गोंड समाज अध्यक्ष शरद मडावी नामदेव कुमरे गुरुजी देवराव पेन्दाम ग्रा.प.सदस्य अश्विनी घोडाम पोलिस पाटील राधा सडमाके सुनील कुमरे गुलाब सयाम सचिन रोषण सपाटे प्रेमा कहालकर कुमरे उज्वला मडावी सुनील कुमरे रत्नाजी पेन्दाम प्रदिप सडमाके रामदास सयाम गणेश सयाम योगेश कुमरे रत्नाजी पेन्दाम उषा गेडाम महेश पेन्दाम जयद्र पेन्दाम विनोद ऊईके अनिता मडावी पुणाजी मडावी वेलेश्वर मसराम मगेश कुमरे सुरज ईस्टाम श्रावण कुमरे भावराव मडावी यासह अन्य मान्यवर होते.
पुढे दिलीप घोडाम यांनी स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.या प्रसंगी प्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले तसेच उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी आदिवासी गोंड समाजातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



