वृत्तवेध
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
मंदिराच्या नावावावर वाळू तस्करांकडून २० ते २५ लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या मौजा उसेगाव येथील त्या खंडणी बहादरांवर चिमूर तहसीलचे तहसीलदार श्रिधर राजमाने व चिमूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे हे उचीत कारवाई करणार काय? हा प्रश्न गंभीर आहे.
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा उसेगांव येथील उमा नदीच्या पाञात अनेक महीन्यापासून अवैधरीत्या रेती तस्करी चालू आहे.या अवैध रेती तस्करी वीरोधात ग्रामस्थांनी पूढाकार घेत ७ जूनच्या राञी पहाटे २ वाजता वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडुन चिमूर पोलीसांच्या स्वाधीन केला.
पण,यामध्ये अवैध रेती तस्कर,ट्रॅक्टर मालक अनीकेत बैस रा.पींपळनेरी,ता.चिमूर यांचा ट्रॅक्टर मौजा उसेगांव येथील युवकांनी पकडल्याने,त्यांनी आपल्या वाणीतून २५ ते ३० ट्रॅक्टर मालकांकडून सतत ५ महीन्यापासुन उसेगांव येथील प्रमूख व्यक्तींकडून हनुमान मंदीराच्या नावाने प्रत्येक महीन्याला ३० हजाराची पावती कापल्याचे व्हीडीओतुन उघडकीस झाले आहे.
हा आकडा जुन २०२६ महीन्यापर्यंत २५ ते ३० लाखाच्या जवळपास जातो आहे.वाळू तस्करांकडून हनुमान मंदीराच्या नावाने मोठ्या प्रमाणात रक्कम वसुल केल्याचे व्हीडिओतुन स्पष्ट दीसुन येत आहे.
मात्र वाळू चोरी करणाऱ्या तस्करांकडून हनुमान मंदीराच्या नावाने पावती कापण्याचा अधिकार संबंधित व्यक्तींना कुणी दिला?आणि ते भ्रष्ट्र व्यक्ती कोण? याचा शोध घेणे तहसीलदार व ठाणेदार यांचे काम आहे.
वाळू चोरट्यांनी आणि हनुमान मंदीराच्या नावाने पावती कापणाऱ्यां खंडणीखोरांनी मोठ्या प्रमाणात शासनाचा महसुल बुडवला आहे.मौजा उसेगाव येथील हनुमान मंदीरांच्या व्यक्तींना वाळू तस्करांकडून पावती कापून रुपये उखळण्याचा अधिकार नसताना,त्यांनी २५ ते ३० लाख रुपयांच्या घरात रुपये उकळले असल्याचे व्हाॅयलर व्हिडिओतून पुढे आले आहे.
मौजा उसेगाव येथील हनुमान मंदीरांच्या व्यक्तींनी वाळू चोरांकडून रुपये उखळण्याचा प्रकार म्हणजे कायद्याला न जुमानता वाळू तस्करांना सहकार्य करणारा कार्यभाग आहे.हा ग़भीर स्वरुपाचा फौजदारी गुन्हा आहे.
तद्वतच लाखो रूपयांची रेती खुलेआमपणे न्या म्हणणारे खंडणीखोर उमा नदीचे मालक आहेत का ? त्यांनी कोणत्या अधीकाराखाली पावती कापली? असा प्रश्न सुध्दा पडतो आहे.
मौजा उसेगाव उमा नदीच्या पात्रातून वाळू तस्करी खुल्लमखुल्ला होत असताना महसुल वीभागाचे संबंधित पटवारी,मंगळ अधिकारी हे पाच महीन्यापासुन झोपून आहेत याबाबत आश्चर्यच नाही काय?
मौजा उसेगाव येथील उमा नदीच्या पात्रातून सुरक्षीत वाळू चोरुन नेणाऱ्यांचा आणि लाखो रुपयांच्या बेकायदा पावत्या कापणाऱ्यांचा शोध चिमूर तहसीलदार व चिमूर ठाणेदार यांनी घेणे व त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणे आवश्यक झाले आहे.
सातत्याने वाळू तस्करीकडे दुर्लक्ष करणारे चिमूर तालुक्यातील अधिकारी,वाळू तस्करांवर आणि लाखो रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्यां इसमांवर कारवाई करतील तर नवलच!…



