राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
(देसाईगंज)
आदिवासी समाजाचे जननायक आणि स्वातंत्र्यसंग्रामातील महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमदार रामदास मसराम यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आमदार रामदास मसराम यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच जल, जंगल, जमीन आणि आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी बिरसा मुंडा यांनी दिलेल्या संघर्षमय योगदानाला आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, माजी सभापती परसराम टिकले, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी उपसभापती नितीन राजूत, धनपाल मिसार, गटनेते विकास प्रधान, नगरसेविका आशाताई दहिवले, गुरमीतकौर चावला, मंदा समर्थ, राधिका पत्रे,विलास बन्सोड,इलियास पठाण,कमलेश बारस्कर,सागर वाढई,रजनीकांत मोटघरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.



