लक्षवेधी
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितीन फुलझेले यांनी चिमूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता आणि सिरपूर गटग्रामपंचायत येथील ग्रामसेवक यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून मौजा शिवणपायली येथील बंद असलेली नळयोजना तात्काळ सुरु करण्याचे निर्देश दिले.
मात्र,संबंधित अभियंता शिंदे आणि ग्रामसेवक भसारकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करुन मौजा शिवणपायली येथील नागरिकांना पाण्याविना तडफडत मरण्यासाठीचा मार्ग मोकळा केला आहे काय? असा प्रश्न मौजा शिवणपायली येथील नागरिकांना पडला आहे.
दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांनी,”मौजा शिवणपायली येथील बंद असलेली नळयोजना पुर्ववत सुरु करण्याबाबत आज चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितीन फुलझेले यांच्यासोबत भ्रमणध्वनी द्वारे चर्चा केली असता,दोन दिवसात मौजा शिवणपायली येथील नळयोजनातंर्गत पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल असे ग्रामसेवक भसारकर यांनी व अभियंता शिंदे यांनी सोमवारलाच सांगितले होते असे त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर आज परत संबंधित अभियंता शिंदे व ग्रामसेवक भसारकर यांच्या सोबत बोलतो व मौजा शिवणपायली येथील बंद असलेली नळयोजना पुर्ववत सुरु करण्याबाबत सांगतो असे गटविकास अधिकारी यांनी चर्चेअंती सांगितले.
मात्र,ग्रामसेवक भसारकर आणि अभियंता शिंदे यांनी मौजा शिवणपायली येथील नागरिकांना नळयोजनांतंर्गत पाणी पुरवठा तात्काळ सुरु करण्याबाबत तसदी घेतली नसल्याचे दिसून येते आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शिंदे व ग्रामसेवक भसारकर यांनी विषेश लक्ष देत मौजा शिवणपायली येथील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करणास नळयोजना पुर्ववत सुरु करावी अशी आर्त हाक तेथील नागरिकांची आहे.



