Home देशविदेश अभंग… — जागतिक पर्यावरण दिन…

अभंग… — जागतिक पर्यावरण दिन…

पर्यावरणाचा । पाच जून दिन ।

चला विणू वीण । निसर्गाची ।।१।। 

   पर्यावरणाचे । संरक्षण करू ।

संवर्धन करू । नियमित ।।२।।

    टाळू या आपण । सर्व प्रदूषण ।

सर्वांचेच प्राण । वाचवू या ।।३।। 

    वृक्ष लागवड । करू या आपण ।

करू या सृजन । तरुंचेच ।।४।।

    सर्वांचीच माता । आहे वसुंधरा ।

दुःखाला न थारा । तिचे कुशी ।।५।। 

     कृती कार्यक्रम । राबवू या सारे ।

आनंदाचे वारे । जीवनात ।।६।।

    जबाबदारी ही । पर्यावरणाची ।

वातावरणाची । शुद्धतेची ।।७।।

     संकल्प दिवस । पर्यावरणाचा ।

या आवरणाचा । सर्वांचाच ।।८।।

     पर्यावरणाचे । करू या रक्षण ।

न करू भक्षण । सृष्टीचे या ।।९।। 

      पर्यावरणाचा । जागतिक दिन । 

ठेवूनिया भान । जपू धरा ।।१०।।

संत कबीर कवीराज पुररकार प्राप्त

               कवी

     प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले

         अमरावती.८०८७७४८६०९