Home देशविदेश अंधत्व जाती धर्माचे…

अंधत्व जाती धर्माचे…

   ( मुक्तकाव्य )

जात जेंव्हा बनते आंधळी

तेव्हा ती कापते 

20 लाख जर्मन ‘ ज्यू ‘ ना 

धर्म जेंव्हा बनतो आंधळा

तेंव्हा तो कापतो 

30 लाख पाकिस्तानी हिंदूंना

रस्त्यावर होतात शेकडो बलात्कार

आदिवासी ,दलित महिलांवर — 1

जात आणि धर्म बनतात

जेंव्हा जात्यांध आणि धर्मांध

तेंव्हा दिसत नाही त्यांना प्रकाश,

कापत सुटतात माणसे 

हजारो आणि लाखो

त्यांच्या हातातील 

जातीच्या हत्याराने

डोळ्यावर बांधून धर्माची पट्टी –२

विसरतात ही 

जात्यांध आणि धर्मांध माणसे

आपलीच ‘ माणुसकी ‘ ही जात

आणि मानवता हा धर्म

आणि बनतात हैवान

हिंस्र पशू — 4

या हिंस्र पशूंचा बंदोबस्त

उपदेश प्रबोधन 

करून नाही झाला तर

त्यांना त्यांचेच भाषेत 

द्यावे लागते उत्तर

अहिंसेचे नव्हे तर हिंसेचेच –५

  कवी : सु द तु 9420912309