Home देशविदेश युवकांचे भवितव्य कशात आहे?

युवकांचे भवितव्य कशात आहे?

         युवकांचे भवितव्य भविष्य पाहण्यात नाही,राहू केतू शनी यात नाही.कारण या अंधश्रद्धा आहेत,ज्या खोट्या आहेत, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचा अभ्यास युवकांना नाही.कारण शालेय अभ्यासक्रमात हा विषय मुद्दाम ठेवला नाही.यात षडयंत्र आहे.ते कोणते ? हा विषय इथे नाही.

    खेळ हा युवकांचा आवडीचा विषय आहे.त्यातल्या त्यात क्रिकेट.कारण खेळ म्हणजे छंद,तो जोपासला की,त्यातून आनंद मिळतो.म्हणून लहान मोठे सर्वच जण आपला छंद जोपासण्याचा प्रयत्न करतात.हे तर बोलून चालून युवक,म्हणजे ऊर्जेचा स्रोत,तो एके ठिकाणी कसा बसणार ? कारण झरे हे प्रवाही असतात.थांबणे हा त्यांचा गुण नाही.तर धावण्यात त्यांना मजा येते.आनंद मिळतो.म्हणूनच युवा शक्तीचे महत्व आहे.

   युवक शाळा कॉलेजचे शिक्षण का घेतात? आई वडिलांची सेवा,समाजसेवा,देशसेवा करायला मिळेल म्हणून नाही.कारण या विषयाचा अभ्यासक्रम पण नाही.तर नोकरीसाठी किंवा उद्योग व्यवसाय करण्यास शिक्षण हे मदत करते म्हणून युवक शिक्षण घेतात,आणि खेळ हा छंद म्हणून खेळतात.परंतु व्यवहारीक अनुभव सर्वांचाच असा आहे की,सुशिक्षित बेकरीचे प्रमाण हे वाढतेच आहे.कोणतेही सरकार आले तरी बेरोजगारी,आणि सुशिक्षित बेरोजगारीचा आलेख हा वाढताच आहे.कमी होत नाही की स्थिरावत पण नाही.नोकरी नसली तरी युवकांना उद्योग व्यवसाय देण्यात पण सारीच सरकारे अपयशी ठरले आहेत.पण बेकरीचे कारण हे सरकार शासन असते,ते कसे ? हेच युवकांना माहीत नाही. हे माहित व्हावे म्हणून युवा पंतप्रधान राजीव गांधी यांनी घटना दुरुस्ती करून मतदानाचा हक्क फक्त 21 वर्षीय प्रौढ नागरिकांचं होता,तो रद्द करून 18 वर्षाच्या युवकांना पण दिला.प्रौढ मतदानासोबतच युवमतदार तयार करण्यात आला.ही राजीव गांधीची देणं होय.तरीही आजचा युवक फक्त क्रिकेट मध्ये गुंग आहे.तो आपल्या भवितव्याचा विचार करत नाही.आपला केवळ छंद जोपासण्यात युवक गुंग आहेत.मतदानाचा ,सरकारचा,सत्तेचा आपल्या जीवनाशी कसा थेट संबंध आहे ? आपले जीवन मरण ,आपले भवितव्य सरकारच्या हातात कसे आहे ? महागाई,भ्रष्टाचार,बेकारी, या प्रश्नासाठी सत्ता कशी जबाबदार असते ? याचा अभ्यास आजचा तरुण करीत नाही.या विषयाकडे त्याचे लक्ष नाही.ते इकडे येऊ नये, म्हनून तर सतत क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्याचे षडयंत्र सरकार करीत असते.युवक रिकामा राहिला तर तो बेकरीवर संघटित होऊन सरकार विरोधी उठाव करू नये,म्हणून तर अभ्यासानंतर,शाळा कॉलेज नंतर अंधार पडेपर्यंत क्रिकेटच खेळत राहा.अंधार पडला तर फोकस चे लाईट लावा,पण खेळतच रहा.मग दमून दमून जेवला की झोपी जा.असा कार्यक्रम योजनाबद्द आहे.हे युवकांना लक्षात येत नाही.खरेतर आपल्याच हाताने आपल्याच पायावर धोंडा घालून घेणे म्हणजे हा खेळ होय.खेळावे पण केवळ एक दोन तासाची त्यास लिमिट असावी.अमर्याद आणि वर्षभर खेळणे घातक आहे.प्रौढ मतदारांनी धर्माची ( अफू) गोळी घेतली.ते धर्माच्याच नशेत गुंग आहेत,आणि युवा मतदार हा क्रिकेटची ( नसेची ) गोळी घेऊन गुंग आहे.खरे तर बेकारी हा विषय सरकार,सत्ता,निवडणूक या विषयाशी संबंधित आहे ? तो कसा ? याचा अभ्यास युवकांनी केला पाहिजे.तरच बेकारी हरेल,अन्यथा सुतराम उपाय नाही.

     आय टी क्षेत्रातील युवक,इंजिनीयर डॉक्टर होऊ पाहणारे विद्यार्थी क्रिकेटच्या नादी नाही लागत,पण याशिवाय इतर विषयाची मुले क्रिकेटच्या नादी लागतात.या पेक्षा आपण मतदार आहोत,आणि बेकारी हा विषय शासनाचा आहे,याबद्दल संघटित होऊन युवकांनी रस्त्यावरची लढाई केली,तरच बेकारी हटेल अन्यथा नाही.डॉक्टर,इंजिनियर, बी टेक, एम. बी. ए वाले युवकांना सहज नोकरी मिळते.खाजगी का होईना,म्हणून ते पॅकेज,बायको, मूल,बंगला गाडी या पलीकडे जाऊन बेकरीचे कारण सत्ता असते,याचा अभ्यास करायला तयारच नाहीत.ते तर सुज्ञ मतदार आहेत. सरकारनी म्हणजेच जनतेच्या पैशातून ते शिक्षण घेतले आणि जनतेला विसरले,बेईमान झाले.ते आपले युवबांधव कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहेत,यांचेशी त्यांचे काहीच देणे घेणे नाही.चार पैशाची मदत पण एखाद्या संघटनेला द्यायची यांची इच्छा नसते.जनतेचे बेईमान हे लोक आहेत.मोठमोठी अधिकारी पण जनतेला बेईमान झाले आहेत.

       सुशिक्षित बेकरीचे नाते थेट सरकारशी आहे.युवा मतदानाचे शस्त्र युवकांच्या हाती आहे.परंतु सारे बेकार युवक यांनी क्रिकेट सोडून मतदान,सत्ता याचा विचार करावा,अभ्यास करावा,आणि फक्त आपला प्रश्न मतदानाच्या आधारे सोडवावा.अभ्यासाला , खेळाला जसे महत्त्व देता तसे राजकारणाला पण वेळ द्यावा आणि आपले अंधकारमय जीवन जगणे आता सोडावे.शिका पण संघटित व्हा,संघर्ष करा.खेळ कमी करा,संघर्ष जास्त करा.मतदान करताना विचार करा.

      लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 4 मे 2026, फोन : 9420912209