वृत्तवेध
भाविकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा…
उन्हाळ्याच्या कडक तापमानातही शिक्षणाची आस आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थेत प्रवेश मिळविण्याची धडपड कायम असल्याचे चित्र सध्या धानोरा परिसरात दिसून येत आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून विद्यार्थी आणि शिक्षक भर उन्हात गावोगावी जाऊन प्रवेशाबाबत जनजागृती करत आहेत.
गडचिरोली जिल्हातंर्गत तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जे.एस.पी.एम.कॉलेजचे प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय थुल यांच्या मार्गदर्शनात,”सकाळपासूनच वाढणारे तापमान,उकाडा आणि लांबचा प्रवास,यांची पर्वा न करता शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देत आहेत.
अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शाखांची माहिती,शासकीय योजनांचा लाभ,स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन तसेच महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा यांची सविस्तर माहिती दिली जात आहे.
अनेक विद्यार्थी देखील शिक्षकांसोबत या मोहिमेत सहभागी होत असून नवीन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांचे हे प्रयत्न कौतुकास्पद मानले जात आहेत.
भर उन्हातही विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू असून शिक्षण क्षेत्रातील त्यांचे समर्पण अधोरेखित होत आहे.
पालकांमधूनही या उपक्रमाचे स्वागत केले जात असून,विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावे आणि उज्ज्वल भविष्य घडवावे,यासाठी जे एस पी एम कॉलेज च्या प्राध्यापक कांकडून होत असलेली मेहनत प्रेरणादायी ठरत आहे.
अकरावी प्रवेशासाठी सुरू असलेल्या या जनसंपर्क मोहिमेमुळे परिसरात शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
या मोहिमेत प्राध्यापक डॉ.गणेश चुदरी,डॉ.हरीश लांजेवार,प्रा.ज्ञानेश बनसोड,प्रा.मानतेश तोंडरे,प्रा.भाविकदास करमणकर,प्रा.कैलास खोब्रागडे,प्रा.विराग रणदिवे,प्रा.वसंत आभारी,प्रा. संजय मांडवगडे इत्यादी सहभागी झाले आहेत.
“उन्हाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षकांची पायपीट सुरूच आहे.,”कारण शिक्षण हाच विकासाचा खरा मार्ग आहे.”



