Home Maharashtra महामार्गावरील खोदाकामामुळे झाला अपघात….

महामार्गावरील खोदाकामामुळे झाला अपघात….

     लक्षवेधी

    राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा

      राजोली येथील २५ वर्षीय युवराज भारद्वाज हे महामार्गावरील खोदकामामुळे झालेल्या अपघातात जखमी झाले.संबंधित ठिकाणी कोणतेही सूचना फलक किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

         रस्त्यावर सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून रात्रीच्या वेळी धोका अधिक वाढत आहे.

       अपघातानंतर जखमी युवराज भारद्वाज यांना पत्रकार गजानन भोयर यांनी तातडीने मदत करत प्राथमिक उपचारासाठी सहकार्य केले.स्थानिक नागरिकांकडून महामार्गावरील कामाच्या ठिकाणी योग्य सूचना फलक,बॅरिकेड्स व प्रकाश व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.