राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
देसाईगंज :- आमदार श्री.रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क कार्यालयात माता रमाबाई आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रनिर्माणातील योगदानाला उजाळा दिला.
कार्यक्रमाला माजी उपसभापती नितीन राऊत,नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान,धनपाल मिसार सर,नगरसेवक राजुभाऊ रासेकर,प्रकाश समर्थ,विक्की रामाणी,नगरसेवक शाम उर्ईके,विलास बन्सोड,कमलेश बारस्कर,नगरसेविका राधिकाताई पत्रे,नगरसेविका आशाताई दहिवले,नगरसेविका फेमिदा पठाण,नगरसेविका गुरमितकौर चावला,वैष्णवी आकरे,इलियास पठाण,परशुराम ठाकरे,आनंदसिंग चावला,राधेश्याम पत्रे,अमोल बुराडे, प्रकाश जीवानी, सुधाकर राऊत,राजकुमार मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.



