Home देशविदेश डिग्रींच्या शिक्षणावरुनच ज्ञान व कर्तव्य ठरवता येतं का? भारताच्या CJI ला प्रश्न…....

डिग्रींच्या शिक्षणावरुनच ज्ञान व कर्तव्य ठरवता येतं का? भारताच्या CJI ला प्रश्न…. — कमी शिकलेल्या संतांना व साहित्य सम्राट अन्नाभाऊ साठेंना ज्ञान नव्हते काय?

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

         ज्ञानार्जन करणे हा अनुकूल व प्रतिकूल परिस्थितील महत्त्वपूर्ण भाग आहे.शिक्षणातून ज्ञान विकसित करणे आणि अनुभवातून ज्ञान विकसित करणे असे ज्ञानाचे दोन भाग आहेत.

        कमी शिकलेली व्यक्ती अनुभवी राहात नाही किंवा त्यांच्यात ज्ञान संपादन करण्याची जिद्द,ओढ,क्षमता राहातं नाही,तो उत्तम ज्ञानी बनत नाही असे अजिबात होत नाही.

           अनेक विषयातंर्गत पदविधर,उच्च शिक्षीत असलेले भारत देशातील नागरिक (महिला/पुरुष),सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी,देशातंर्गत सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी,न्यायाधिश, जेव्हा स्वत:च्या समाजाच्या आणि इतरेत्र समाजाच्या हितासाठी,सुरक्षासाठी, उन्नतीसाठी,शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी,जातिभेद निर्मूलन करण्यासाठी,न्याय व्यवस्था प्रत्येक समाजात रुजविण्यासाठी,प्रत्येक समाज घटकातील नागरिकांना त्यांचे हक्क भारतीय संविधानानुसार देण्यासाठी,कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता समानतेतून आणि निर्मल चारित्र्यसंपन्नतेतून कर्तव्य पार पाडत असल्याचे दिसून येत नाही.मग त्यांच्या शिक्षणाचा व पदाचा काय फायदा? हा प्रश्न भारत देशाचे मुख्य न्यायाधीश सुर्यकांत शर्मा यांना आहे..

         देशाचे मुख्य न्यायाधीश मानसाची व मानुष्किची परिभाषा,धर्म,जात,लिंग,भेद,ज्ञान पुढे ठेवून करत असतील तर,ते योग्य ज्ञानाची व ज्ञानाचा सदोपयोगाची परिभाषा करण्यास कमी पडतात,हे लक्षात घेतले पाहिजे.

        भारत देशाचे मुख्य न्यायाधीश सुर्यकांत शर्मा यांनी भारतीय संविधान वाचलेले आहे.मग? भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९ अंतर्गत भारत देशातील कामगार,शेतकरी,बेरोजगार,पिडित,शोषीत,अन्यायग्रस्त,अत्याचारग्रस्त,हक्कविहिन आणि दबलेल्यां,खचलेल्या सर्व भारतीय नागरिकांना (महिला/पुरुष) आणि इतर सर्व भारतीय नागरिकांना (महिला/पुरुष) बोलण्याचा व लिहिण्याचा,अधिकारांसाठी संघर्ष करण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे,यात तर शिक्षणाची अट अजिबात घातली नाही.

       मग लिहिण्याला,व्यक्त होण्याला शिक्षणाची अट का म्हणून भारतीय संविधानात घातली गेली नाही?,हे देशाच्या मुख्य न्यायाधीशांनी आधी पुरेपूर समजून घेतले पाहिजे. 

         खेड्यापाड्यातील लोक कमी शिकलेली असतात,यांचा अर्थ असा नाही की त्यांना ज्ञान राहात नाही,अनुभव राहात नाही.त्यांच्या परिने त्यांना ज्ञान व अनुभव असतेच आणि श्रमातंर्गत जगण्याची उत्तम माहिती सुध्दा त्यांना असते.तद्वतच परिस्थितीला कसे हाताळायचे याची समजही त्यांना असते.

            जास्त शिकलेली भारत देशातील लोक-लोकप्रतिनिधी-अधिकारी-कर्मचारी-न्यायाधिस,वकील,इतर क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्ती,हे भारत देशातील नागरिकांच्या अधिकारांसाठी,त्यांच्या सर्वकश उन्नतीसाठी,भारत देशांतर्गत जातीभेद निर्मूलनासाठी,देशातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी,कामगारांना व बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी,शेतकऱ्यांच्या हितासाठी,जात व धर्म न बघता अन्याय-अत्याचाराविरुध्द संघर्ष करण्यासाठी,कार्य करीत नसतील,संघर्ष करीत नसतील तर त्यांच्या उच्च शिक्षणाचा काय उपयोग?,हा प्रश्न सुध्दा भारत देशाच्या मुख्य न्यायाधीशांना आहे.

******

 संत कबीर….

    (१३९८-१५१८) हे १५ व्या शतकातील एक महान भारतीय संत,कवी आणि सामाजिक सुधारक होते.मानवतेचा संदेश देणारे त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत.

     त्यांनी मूर्तिपूजा,तीर्थयात्रा,आणि बाह्य डामरटोला यांसारख्या कर्मकांडांचा तीव्र विरोध केला.त्यांनी कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार न करता,मानवधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म मानला.

      साहित्‍यसंत कबीर साक्षर नव्हते,तरीही त्यांनी मौखिक स्वरूपात विपुल काव्यरचना केली.त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या शिकवणीचे संकलन विविध ग्रंथांमध्ये केले आहे.बीजक हा कबीरांचा सर्वात प्रमुख आणि प्रसिद्ध ग्रंथ आहे.

********

संत नामदेव…..

       (इ.स. १२७० – इ.स. १३५०) हे वारकरी संप्रदायातील महान संत,कवी आणि आद्य कीर्तनकार होते.त्यांनी मराठी व हिंदी भाषेत विपुल अभंगरचना केली.त्यांच्या रचना शिखांच्या पवित्र ‘गुरु ग्रंथसाहिब’ ग्रंथातही समाविष्ट आहेत.

       संत नामदेव हे मराठीतील आद्य चरित्रकार आणि कीर्तनकार मानले जातात.राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदी साहित्यसंत नामदेवांनी महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता उत्तर भारतात प्रवास केला आणि भागवत धर्माचा (विठ्ठल भक्तीचा) प्रचार केला.त्यांनी हिंदी भाषेत अनेक पदे रचली.शीख धर्माचे पवित्र धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथसाहिब’ मध्ये संत नामदेवांची एकूण ६१ पदे समाविष्ट आहेत,ज्यांना ‘नामदेवजी के पद’ म्हणून ओळखले जाते.

*******

जगद्गुरू संत तुकाराम महाराज…..

      (१६०८–१६५०) हे महाराष्ट्रातील १७ व्या शतकातील एक महान वारकरी संत,कवी आणि समाजसुधारक होते.त्यांनी आपल्या अभंगरचनेच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार केला आणि तत्कालीन समाजव्यवस्थेतील अनिष्ट रूढी-परंपरांवर कडाडून प्रहार करून सामाजिक समतेचा संदेश दिला.

     संत तुकाराम महाराजांचा जन्म इ.स. १६०८ मध्ये पुणे जिल्ह्यातील ‘देहू’ या गावी झाला.त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा मोरे.त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई होते. 

      काठसंत तुकाराम महाराजांनी मराठी भाषेत हजारो ‘अभंग’ लिहिले.त्यांची अभंगगाथा आजही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाया मानली जाते.तत्कालीन कर्मठ समाजाकडून त्यांच्या अभंग लेखनाला विरोध झाला आणि त्यांच्या अभंगांच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवल्या गेल्या.

       त्यांनी वर्णव्यवस्थेचा विरोध केला आणि ‘भेदभाव विसरून सर्वांनी एकत्र यावे’ हा विचार मांडला.समाजातील ढोंगीपणा,अंधश्रद्धा आणि बाह्य आचारांवर त्यांनी आपल्या अभंगांतून अत्यंत रोखठोक शब्दांत टीका केली.

     त्यांची “झाली नामाची सोय, पावले अभय” आणि “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” ही वचने आजही मानवी जीवनाला योग्य दिशा देणारी आहेत.

*******

संत गाडगे महाराज…..

     (२३ फेब्रुवारी १८७६ – २० डिसेंबर १९५६) हे महाराष्ट्रातील एक महान संत,कीर्तनकार आणि समाजसुधारक होते.

       ‘स्वच्छतेचा संदेश’ देणाऱ्या गाडगे महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य दीन,दुबळे,अनाथ आणि उपेक्षितांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते.”स्वच्छतेशिवाय ज्ञान नाही’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.

      त्यांनी आयुष्यभर जात-पात,अंधश्रद्धा,रूढी-परंपरा आणि प्राण्यांचा बळी याविरुद्ध लढा दिला.

       “तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी” (खरा देव माणसात आहे) अशी त्यांची शिकवण होती.

      कीर्तनातून ते लोकांना व्यसन न करण्याचे,कर्ज न काढण्याचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत.कीर्तनाच्या शेवटी ते लोकांना प्रश्न विचारून प्रबोधन करत आणि जमलेल्या पैशातून गोरगरिबांसाठी शाळा,धर्मशाळा,आणि अनाथालये उभी केली.

     त्यांनी गरीब व अनाथ लोकांसाठी अनेक ठिकाणी धर्मशाळा व आश्रम सुरू केले.त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून,”संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान’ राबवले जाते,अमरावती येथील विद्यापीठाचे नाव ‘संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ’ असे ठेवण्यात आले आहे.

********

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज……

(३० एप्रिल १९०९ – ११ ऑक्टोबर १९६८) हे महाराष्ट्रातील एक महान आधुनिक संत,कवी,समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. 

       अंधश्रद्धा व जातिभेद निर्मूलन तसेच ग्रामविकासासाठी त्यांनी आयुष्यभर खंजिरी भजनांच्या माध्यमातून जनजागृती केली.

      स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग घेतल्यामुळे त्यांना १९४२ मध्ये तुरुंगवासही झाला.

     त्यांच्या देशप्रेम आणि समाजकार्याने प्रभावित होऊन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी दिली.

      १९५५ मध्ये जपान येथे भरलेल्या ‘जागतिक धर्म आणि विश्वशांती परिषदेत’ त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

      ग्रामविकासाचा पाया रचणारा आणि ‘ग्रामोद्धारा’चा संदेश देणारा ‘ग्रामगीता’ हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे.हा ग्रंथ आजही ग्रामीण भागात अत्यंत आदराने वाचला जातो.याशिवाय त्यांनी ‘आनंदामृत’, ‘भावबोधन’ यांसारख्या अनेक ग्रंथांची आणि देशभक्तीपर भजनांची रचना केली.

*******

साहित्य सम्राट अनाभाऊ साठे….

        मराठी साहित्यात ‘साहित्यसम्राट’ (किंवा साहित्य सम्राट) ही पदवी प्रामुख्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना दिली गेली आहे.

        त्यांनी लिहिलेल्या फकीरा सह अनेक कादंबऱ्या,कथा,पोवाडे आणि लोकनाट्यांमुळे त्यांना हा गौरव प्राप्त झाला आहे. 

 ******

 कर्तव्य व कार्य…..

       न शिकलेल्या,फारच कमी शिकलेल्या भारत देशातील संतांनी आपल्या अफाट विचारातंर्गत (ज्ञान) समाजसुधारनेचे महान कार्य केले आहे.याचबरोबर अन्नाभाऊ साठे हे साहित्य सम्राट ठरले आहेत.

        याचा अर्थ ज्ञानासाठी व लोकहिताचे कार्य करण्यासाठी-त्यांच्या हितसंबंधाने संघर्ष करण्यासाठी पदव्यांची गरजच असते असे बिलकुल नाही हे भारताच्या मुख्य न्यायाधीशांनी समजून घेतले पाहिजे…

             आपापल्या भाषेत लोकसेवा करण्यासाठी तथा उत्तम लिखाण करण्यासाठी,मुळातच समतातंर्गत निर्मल मन,द्वेषमुक्त योग्य विचार,समजदारपणा,संघर्ष करण्याची सचोटी,परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य पाहिजे.यासाठी मोठमोठ्या पदव्यांचे शिक्षण लागते असे होत नाही..

        मोठमोठ्या पदव्यांचे शिक्षण घेणारे लोक हे भारत देशातील जातीभेद व विषमतावाद नष्ट करण्यासाठी,पुढे येत नसतील तर त्यांच्या शिक्षणाचा काय उपयोग?