माणूस जन्मतो, त्याचे बालपण संपते,लहानाचा मोठा होतो म्हणजे 18,21 वर्षाचा होतो,म्हणचेच तो सज्ञानी होतो, सज्ञान होणे म्हणजे समजायला लागणे, हे असे का ? ते तसे का ? असे प्रश्न निर्माण होणे आणि त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ज्ञान मिळविणे होय,
माणूस लहानाचा मोठा होतो म्हणजे सज्ञान होतो परंतु तो ज्ञान घेतोच असे नाही, किंवा ज्ञान मिळतेच असे नाही, याचे कारण आपण ज्या परिस्थितीमध्ये जगतो त्या परिस्थितीमध्ये ज्या अनेक समस्या आहेत, त्या समस्या कोणत्या, आणि त्यात का आहेत ? कारण काय? आणि त्यावर उपाय कोणते? असे प्रश्न ज्याला पडत नाही असा माणूस अज्ञानच म्हटला पाहिजे. असे प्रश्न बहुतांशी लोकांना पडत नाहीत, म्हणून माणूस वयाने मोठा झाला त्याचा मेंदू किती मोठा झाला आणि तो जर विचारशील नाही बनला तरी तो बहुतेक अवयवाच्या दृष्टीने सज्ञान होऊ नये तो अज्ञानच असतो. बहुतांशी माणसे आपले संपूर्ण आयुष्य अज्ञानातच जगत असतात किंवा संपवितात, असे दिसते. असे असताना पण, म्हणजेच माणसे अज्ञानात जगत असताना पण आशा,स्वप्न,धेय्य उरी बाळगून जगताना दिसतात.
आपण जी आशा करतो, तिला काही अर्थ आहे का ? आपण जे स्वप्न घेऊन जगत असतो, त्या स्वप्नाला काही अर्थ आहे का ? आपण जे ध्येय घेऊन जगत असतो, त्या ध्येयाला काही अर्थ आहे का ? असा अर्थपूर्ण विचार माणूस करतोच असे नाही, यास काही अपवाद असतीलही, परंतु बहुतांशी माणसे असा विचार करताना दिसत नाहीत. अर्थपूर्ण जीवन जगणे म्हणजे काय ? असा प्रश्न बहुतांशी लोकांना पडतच नाही.
माणसाच्या ज्या गरज आहेत, उदाहरणार्थ मूलभूत गरजा, आवश्यक गरजा, सुख सोयीच्या गरजा, आणि चैनीच्या गरजा, सर्वसामान्य माणसे हे या पाच गरजा पूर्ण करण्यासाठी आशावादी बनून आपले संपूर्ण आयुष्य जगत असतात. आशेवर जगणे म्हणजे ध्येयवादी जगणे किंवा स्वप्नपूर्तीसाठी जगणे असे म्हणता येत नाही, तर आशेवर जगणे म्हणजे आपल्या गरजा वाढविणे आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपले आयुष्य झिजवणे असे म्हणावे लागते. माणूस हा आशेवर जगतो, आणि आशापूर्ती होण्यामध्ये जेव्हा अपयश येते, तेव्हा एक तर तो प्रयत्न वाद सोडून दैववादी बनतो, किंवा देवाचा धावा करायला लागतो, तू श्रद्धाळू बनतो, श्रद्धेत विवेकता नसेल तर, तो अंधश्रद्धाळू बनतो, अंधविश्वासू बनतो. धर्मांध पण बनतो.
बालपणातच माणसावर कुटुंबीय व्यवस्थेचा, जातिव्यवस्थेचा, देवाचा धर्माचा संस्कार पडलेला असतो, तो संस्कार घेऊनच तो श्रद्धाळू बनलेला असतो, या श्रद्धेचा उपयोग तो आपले स्वप्न किंवा आपल्या अशा पूर्ण करण्यासाठी करायला लागतो, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधी तो आशावादी असतो, परिस्थितीमुळे जर त्याच्या गरजा पूर्ण होत नसतील, किंवा गरजा वाढतच असतील, तर तो जेव्हा प्रयत्न कमी पडतात, तो किंवा निराशा होऊन तो श्रद्धे कडे चुकतो, आणि माणूस देववादी आणि दैववादी आणि धर्मवादी बनतो. नैतिकता सोडतो, देव आणि धर्माचा उपयोग करून किंवा या गोष्टींना समोर करून अनेक अनैतिक, भ्रष्टाचारी, अन्यायी, अत्याचारी जीवन जगत असतो.
आशाला जेव्हा मर्यादा नसते, म्हणजे अशा जेव्हा मर्यादा सोडते, म्हणजेच माणसाला सर्व प्रकारची संपत्ती मिळाली, आणि त्या संपत्तीच्या आधारे सर्व क्षेत्रातील सर्व महत्त्वाची पदे जरी मिळाली, अनेक पद मिळाल्यामुळे प्रतिष्ठाही मिळाली, म्हणजेच माणूस आशावादी बनून तो सत्ता संपत्ती प्रतिष्ठा सर्व काही मिळाले, तरी त्याच्या आशेला जेव्हा लगाम लागत नाही, तेव्हा आशा चे रूपांतर अहंकारात होते.आणि एकदा का माणसाला अहंकार जडला की,माणूस हा माणूस राहत नाही,तर तो देवाचाही राक्षस बनतो.( हे वाक्य आस्तिक वाचकांसाठी ) .आधी गरजा पूर्ण करण्यासाठी आशा करणे हे काही चुकीचे किंवा वाईट नाही,पण जेंव्हा साऱ्या गरजा पूर्ण होऊन ही, म्हणजे भरपूर संपती श्रीमंती ,सत्ता ,प्रतिष्ठा सर्वकाही मिळूनही जेंव्हा माणसाची आशा थांबत नाही.आशेला ब्रेक लागत नाही,आशेची गाडी भरधाव धावते,तेंव्हा ॲक्सिडेंट होणारच.हे पण माणसाला समजते,तरी तो आशा सोडत नाही. किंवा आशा त्याला सोडत नाही, म्हणून तो अहंकारी बनतो, त्याची अहंकारी वर्तन सुरू होते. राग द्वे ष मान माया लोक बदला घेणे, सूड उगविणे, अन्याय अत्याचार करणे सुरू होते. म्हणून आपल्या गरजा पूर्तता होईपर्यंत माणूस आशावादी राहणे काही चुकीचे नाही, परंतु माणूस जेव्हा अहंकारी बनतो, वाजवा अहंकार बाळगतो हे संस्कृतपणाचे लक्षण नव्हे.
काही माणसे स्वप्न घेऊन जगत असतात, कुणाला डॉक्टर इंजिनियर किंवा अधिकारी व्हावेसे वाटते, कुणाला राजकारणात जाऊन राजकीय नेता व्हावेसे वाटते, कुणाला महाराज बनून धार्मिक उपदेश करीत फिरावेसे वाटते, कुणाला सामाजिक कार्यकर्ता बनवून समाज परिवर्तन व्हावेसे वाटते, कुणाला भरपूर संपत्ती मिळवून भांडवलदार व्हावेसे वाटते, अशी अनेक स्वप्न घेऊन जगणारी अनेक माणसे या दुनियेत आहेत, अर्थात सगळ्यांचीच स्वप्न पूर्ण होतात असे नाही, आपल्या पुऱ्या आयुष्यात स्वप्न अपूर्ण असणारीच माणसे आपणास बघायला मिळतात, स्वप्न पूर्ण करणारी माणसे फार कमी म्हणजे फक्त बोटावर मोजण्याएवढी आपणास दिसतात. हे असे का घडते ? हा एक विचार करण्याचा एक स्वतंत्र विषय आहे, हा एक चिंतनाचा विषय आहे. आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक विषयात किंवा विषयाचा अभ्यास करून त्या क्षेत्रात मोठे होण्याचे स्वप्न काही लोक बाळगतात, फक्त बोटावर मोजण्या एवढेच लोक यशस्वी होतात आणि बाकीचे अपयशी होतात, असे का घडते ? यावर चर्चा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जसे स्वप्नाचे आहे तसेच ध्येयाचे पण आहे, सर्वच क्षेत्रात अज्ञानी सोडा पण सज्ञान मानसी किंवा विचारवंत सुद्धा जेव्हा एखादे ध्येय उरी बाळगून कामाला लागतात, तेव्हा त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत नाहीत, अशी बहुतांशी ध्येयवादी लोक असतात आहेत, हे असे का घडते ? यावर सुद्धा चिंतन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या चिंतनाची ज्यांना आवश्यकता वाटते, त्यांनी एकत्र आले पाहिजे. कारण एकत्र येणे ही कधीही केव्हाही काळाची गरज असते. परंतु विचारवंत एकत्र येत नाहीत आणि सामूहिक कृती करीत नाहीत, मीच तर खरी शोकांतिका आहे. म्हणून दुर्जन पुढे आणि सज्जन मागेच असताना दिसतात. सज्जन आणि दुर्यन यांच्यात संघर्ष झाला पाहिजे, वैचारिक लढाई झाली पाहिजे, याशिवाय आशाला आळा बसणार नाही,स्वप्नपूर्ती होणार नाही.ध्येयवादी ध्येय्य गाठू शकणार नाहीत.परिवर्तन पण शक्य नाही.
अनेकांची आशा, स्वप्न, धेय्य सारखीच असतील असे नाही, आणि ते असणारही नाहीत, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, आणि व्यक्ती तितके विचार हे नैसर्गिक सत्य जाणून घेतले पाहिजे, ही जाण असतानाही सारख्या प्रवृत्तीची, सारख्याच प्रकृतीची , सारख्याच विचाराची माणसे मात्र एकत्र येऊ शकतात, कारण साने गुरुजी म्हणाले की,” समान सवयीची आणि समान विचाराची माणसे फार लवकर एकत्र येतात लोहचुंबकासारखे ” पण त्यांना शोधून काढून एकत्र आणणारे पण काही व्यक्ती हवेत.
तसेच वेगवेगळ्या प्रकृतीची, अलग अलग प्रवृत्तीची स्वभावाची, अनेक विचारांची माणसे जरी असतील, तरी समाजात जे राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक प्रश्न आहेत, समस्या आहेत, ज्यांचा दैनंदिन जीवनात बहुजनांना त्रास होतो आहे, असे प्रश्न आणि अशा समस्या वर एकत्र येणार संघटित होण्यास काय काय हरकत असावी ? खरे तर यासाठी काहीच अडचण नाही, फक्त प्रत्येकाने आपापली आशा स्वप्ने ध्येय काही जरी असले तरी ” किमान समान कार्यक्रमासाठी एकत्र येणे ही काळाची गरज असते. विविध समस्या वर संघटित होत नाहीत आणि संघर्ष करीत नाहीत त्या समस्यांचा अभ्यासही करत नाहीत म्हणून माणसाला वाईट दिवस भोगावे लागतात. कुणीही कोणत्याही पक्षाचे असा, कोणत्याही सामाजिक संघटनेचे असा, कोणत्याही धर्माचे जातीचे असू , पण जसे परकीय आक्रमण देशावर होते तेव्हा जसे देशातील सर्व लोक आपली जात धर्म पक्ष ध्येय अशा स्वप्न सगळे सोडून एकत्र येतात, अखंड देशासाठी जीव देण्याची तयारी असते, तसेच साऱ्यांचा जेव्हा एखादा प्रश्न असतो किंवा समस्या असते तेव्हा पण सगळ्यांनी आपण आपल्या वैयक्तिक गोष्टीचा विचार न करता, एक राजकीय समस्या म्हणून किंवा सामाजिक समस्या म्हणून किंवा धार्मिक समस्या म्हणून सर्वांनी आपला अहंकार बाजूला ठेवून, आपली महत्त्वकांक्षा बाजूला ठेवून, स्वतःचा विचार न करता सगळ्यांचा विचार होणे जरुरीचे आहे, यासाठी कधीही अहंकार न बाळगता, स्वतःचा मोठेपणा न मिळविता, स्वतःच्या पदाला महत्व न देता, सर्वसामान्य लोकांसोबत असणे, त्यांच्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशी कृती करण्यात किंवा वागण्यातच खरे शहाणपण असते. अहंकारी जीवन जगणे म्हणजे अज्ञान होय किंवा मूर्खपणाचे होय. प्रत्येक माणसाने आपली आशा, आपले स्वप्न, आपले ध्येय पूर्ण करायची असल्यास जनतेला धरूनच ते पूर्ण होईल, जनतेला सोडून आपली आशा स्वप्न ध्येय पूर्ण होऊ शकत नाही.


