ऋषी सहारे
संपादक
सालमारा :- आरमोरी विधानसभा मतदारसंघातील सालमारा येथे निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईची गंभीर दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी आज गावाला भेट दिली.
यावेळी आमदार मसराम यांनी गावातील पाणीपुरवठा योजनेची व पाण्याच्या टाकीची प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महिला भगिनींनी हंडे घेऊन पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या वणवणीची व्यथा आमदारांसमोर मांडली.
‘हर घर जल’ योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी फसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याची गंभीर दखल घेत आमदार मसराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
ग्रामस्थांना तातडीने दिलासा देण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू करण्याचे तसेच पाणीपुरवठा योजना तत्काळ दुरुस्त करून सुरळीत करण्याचे सक्त आदेश आमदारांनी अधिकाऱ्यांना दिले. “नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही, याची दक्षता घ्या,” अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी मिसार सर, दिलीप घोडाम,ऋषी सहारे, गंगाधर कुमरे गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.



