Home देशविदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव नसून समग्र परिवर्तनाचा विचार आहे :- आंबेडकरी अभ्यासक प्रा.डॉ.अनंता...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव नसून समग्र परिवर्तनाचा विचार आहे :- आंबेडकरी अभ्यासक प्रा.डॉ.अनंता सूर.

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

             भीमटेकडी येथे चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन पार पडले‌.यावेळी संमेलनाध्यक्ष अनंत सूर म्हणाले २६ जानेवारी १९५० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले भारतीय संविधान आमच्या हाती पडले आणि आम्ही प्रजासत्ताक देशाचे सार्वभौम नागरिक झालो.स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या सर्वोच्च मूल्यांना उराशी कवटाळून आकाशातील पाखरांसारखे जगायला शिकलो.

 उपस्थित श्रोत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार……

     अमरावती,शब्दास्त्र विचार मंच,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चौथे एक दिवसीय परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनात कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी विचार मंचावर उद्घाटक सुषमा पाखरे,स्वागताध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.गोपीचंद मेश्राम,प्रा.मुकुंद भारसाकळे,प्रा डॉ.वसंत शेंडे,प्रा.डॉ.रविकांत महिंदकर,प्रा.अरुण बुंदेले,मुख्य संयोजक रमेशचंद्र कांबळे,शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे,प्रा देवानंद पाटील,विद्रोही अविनाश गोंडाणे,पद्माकर मांडवधरे,दिलीप शापामोहन उपस्थित होते.

       कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे,स्मृतीशेष सुखदेवराव तिडके,सूर्यभानजी मेश्राम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

                            डॉ.अनंता सूर पुढे म्हणाले,दारिद्र्याने पछाडलेल्या माणसासाठी कित्येक युगानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला सामाजिक स्वातंत्र्याचा लढा या भूमीवर मोठ्या उर्जेने उभारला आणि आम्ही अंधारातून उजेडात जगायला लागलो.आता पुन्हा माणसाला गुलामीत जगायला भाग पाडणारी संस्कृती इथले मूठभर सत्ताधारी लोक राजकारणाच्या आधारावर निर्माण करू पाहत आहेत.परिणामी स्वातंत्र्यातही कला,साहित्य,विचार आणि तत्वज्ञान उरी बाळगून जगणाऱ्यांची अवस्था एखाद्या पिंजऱ्यातील पक्षांसारखी जायबंदी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा खटाटोप चाललेला आहे.यापासून आम्ही सावध झालो पाहिजे.तेव्हाच आम्हाला आपला सर्वांगीण विकास साध्य करता येईल,असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

         प्रमुख पाहुणे प्रा.मुकुंद भारसाकळे आपले मत व्यक्त करतांना म्हणाले,बुद्ध,फुले,शाहू, आंबेडकरी विचार उपेक्षित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरक आहे.

     प्रमुख पाहुणे प्रा.अरुण बुंदेले म्हणाले आंबेडकरी साहित्यात शब्दांची जुळवाजुळव नसून सामाजिक विषमतेविरुद्ध तीव्र विद्रोह असतो असे मत व्यक्त केले.

       साहित्य संमेलनाला उत्तमराव गवई,अशोक रामटेके,शिवा प्रधान,एस.कुमार मेश्राम,आनंद मेश्राम,राजेश वैद्य,श्रीराम डोंगरे,महादेव बागडे,रचना कांबळे,कमला नंदागवळी,सागर भोवते,पद्मा घरडे,वासुदेव डोंगरे,अनिल अघम,प्रा.निरंजन नवले,अनिल पाटील,उर्जा कांबळे,सुनीता रायबोले,ताराचंद करवाडे,चरणदास नंदागवळी,सिद्धार्थ गोंडाणे, राष्ट्रपाल घरडे,नारायण मेंढे,जगन मोरे,प्रकाश अंभोरे,गणेश थोरात,विजय पाटील,विवेक शहारे,सुदर्शन धाकडे,शेषराव घरडे,दिनेश मेश्राम,प्रतिभा मेश्राम,रामेश्वर रामटेके,संजय डोंगरे,अरुण रामटेके,पवन डोंगरे,मयुर गायकवाड,अशोक गणवीर, ज्ञानेश्वर मेश्राम,वसंत नाईक,इकबाल जावेद,शिवलाल पवार,रघुनाथ तेलमोरे,नारायण थोरात,प्रवीण सरोदे,वासुदेव गोसावी,विकास इंगळे, भाऊ नागदिवे,अरुण गावंडे,चंदन नाईक,अमोल माहोरे,विनोद कावरे,विठ्ठल तंतरपाळे,विकास डोंगरे,रिजवान शेख,नंदू सावळे,पल्लवी मते,यश तेलमोरे मधु हिरेकर,नंदू पाटील,प्रेरणा पांडे,पवन डोंगरे,दिनेश मेश्राम,दिनेश टेंभुर्णे ,शैलेश मेश्राम,किरण शहारे,तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनसमुदाय उपस्थित होता.

        प्रास्ताविक प्रवीण कांबळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय दिलीप शापामोहन यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.देवानंद पाटील यांनी केले तर आभार पद्माकर मांडवधरे यांनी मानले.

साहित्य संमेलनातून नवं तरुण घडतो. :- डॉ.वसंत शेंडे….

         साहित्य हे एका बाजूला नैतिकता पण देते आणि एका बाजूला अज्ञान पण देते.साहित्य हे ज्ञान देण्याचं देखील स्रोत आहे तर साहित्य हे अज्ञान देण्याचं देखील स्रोत आहे.साहित्यिक कसा असेल त्याच्यावर त्याची कलाकृती अवलंबून असते.साहित्य संमेलनातून नवं तरुणांची जडण घडणं होत असते त्यामुळेच साहित्य संमेलन होणे काळाची गरज आहे असे प्रमुख पाहुणे डॉ वसंत शेंडे म्हणाले.

कसदार साहित्य निर्माण झालं पाहिजे :- सुषमा पाखरे…

           मन,मेंदू आणि मनगट बळकट करण्याचं काम साहित्य करतं आणि असं कसदार साहित्य निर्माण होण्यासाठी जी जी काही माणसं जगतात त्यांना उभारी दिली पाहिजे.तरुण पिढी साहित्याकडे कशी वळेल यावर विचार होणे देखील महत्वाचे आहे,नुसता विचार होणे महत्वाचे नसून त्यावर कृतिशील होणे हे ही तितकेच महत्वाचे आहे असे मत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक सुषमा पाखरे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक समाजाला दिशा देण्याचे कार्य करतात. :- डॉ.रविकांत महिंदकर…

          आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि मनोरंजनाच्या साधनांमुळे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण करणे,ग्रंथालयाचा वापर वाढवणे आणि साहित्यिकांच्या कार्याची ओळख करून देणे अत्यंत गरजेचे आहे,कारण साहित्यिक समाजाला दिशा देण्याचे कार्य करतात,असे मत प्रमुख पाहुणे डॉ.रविकांत महिंदकर यांनी व्यक्त केले.

“बुद्ध फुले शाहू आंबेडकरी साहित्य विचार उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरक”:- प्रा.मुकुंद भारसाकळे…

        ” बुद्ध – फुले -शाहू – आंबेडकरी साहित्य विचार उपेक्षित समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रेरक आहे.आंबेडकरी साहित्यिकांनी केवळ विचार न मांडता समाज उन्नतीच्या आंबेडकरवादी,वास्तववादी चळवळी जमिनीवर उतरुन राबविल्या पाहिजेत.अन्यथा “आचाराविना विचार वाया ” अशी गत होईल. “असे विचार संमेलनाचे प्रमुख अतिथी समाजप्रबोधनकार प्रा.मुकुंद भारसाकळे यांनी व्यक्त केले.

आंबेडकरी साहित्यात सामाजिक विषमतेविरुद्धचा तीव्र विद्रोह असतो.:- प्रा.अरुण बुंदेले…

    मराठी साहित्यात प्रस्थापित चौकटींना छेद देणारी ही एक मोठी विद्रोही परंपरा आहे.आंबेडकरी साहित्यात शब्दांची जुळवाजुळव नसून सामाजिक विषमतेविरुद्धचा तीव्र विद्रोह असतो आणि न्यायाची मागणी असते.कारण आंबेडकरी साहित्याचा जन्मच वेदनेतून झालेला आहे.बाबासाहेबांचे शिका,संघटित व्हा,संघर्ष करा’ हे ब्रिद्रवाक्य या आंबेडकरी साहित्य संमेलनाचा पाया असतो.या आंबेडकरी भीमविचार मंचावरुन उपेक्षितांच्या साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे फार मोठे कार्य होत आहे.”असे विचार संमेलनाचे प्रमुख अतिथी परिवर्तनवादी साहित्यिक प्रा. अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.