शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात जिओ नेटवर्कचे कव्हरेज राहात नसल्याने ग्राहक कमालीचे परेशान झाले आहेत.
जिओचे नेटवर्क वारंवार बंद राहत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.याचबरोबर जिओ नेटवर्कची समस्यां ग्राहकांना नाहक त्रास देणारी ठरली आहे.
मोबाईलव्दारे संवाद साधणे,आँनलाईन व्यवहार करणे,तसेच शासकीय सेवांचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
जिओ कंपनीच्या संचालकांनी व कामगारांनी जिओची नेटवर्क समस्या सोडवावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
अलिकडच्या काळात जिओ कंपनीचे संचालक,कामगार हे ग्राहकांना योग्य नेटवर्क देण्यास अयशस्वी ठरले आहेत.यामुळे जिओचे ग्राहक भयंकर परेशान झाले आहेत.
जिओची सेवा ग्राहकांना पुरेसे नेटवर्क उपलब्ध करून देण्यास अयशस्वी ठरत असल्याने,”या कंपनीचे सिमकार्ड बदलायचे काय?हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.



