Home Social भावेश कोटांगले भंडारा जिल्ह्यात लोककलेचे सादरीकरण संपन्न…  

भावेश कोटांगले भंडारा जिल्ह्यात लोककलेचे सादरीकरण संपन्न…  

ऋग्वेद येवले 

   उपसंपादक 

         महाराष्ट्र शासन महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय अमृत अभियान २ च्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती पोवाडा, भारुड, गोंधळ , या लोककलेच्या माध्यमातून संगीतमय वातावरणात भंडारा जिल्ह्यातील , भंडारा, साकोली, लाखनी मोहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर मध्ये भावेश कोटांगले जनजगार पथनाट्य संच यांनी कौटिल्य मल्टीक्रिएशन प्रा.लिमिटेड या संस्थेमार्फत विकास रायटे यांच्या नेर्तृत्वात सादर करण्यात आले.

         कार्यक्रमात अमृत अभियान 2 च्या वतीने शहरातील प्रत्येक घराला नळाने शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा करणे, तलाव सरोवर नाले व इतर जलस्त्रोतांचे संवर्धन व पुनर्जीवन करणे, शहरातील मोकळ्या जागेत उद्याने व हरितक्षेत्र विकसित करणे, ज्या घरांना अजून नळ नाही त्यांना नवीन कनेक्शन देणे, तलाव विहिरी बंधारे यांचे पुनर्जीवन व खोलीकरण करून पाणीपुरवठा वाढविणे, नवीन उद्याने विकसित करणे,जुन्या उद्यानाचे नुतनीकरण करणे, उढ्यानमध्ये रेंन वॉटर हार्वेस्टिंग, प्रक्रिया,केलेले सांडपाणी वापरून झाडे जगविणे, अशा विविध योजनांची माहिती पोवाडा,भारुड ,गोंधळ यांच्या मार्फत सादर करण्यात आले.

         जनजागर पथनाट्य टीम मध्ये भावेश कोटांगले, तेजस कोटांगले, प्रल्हाद भुजाडे, करिष्मा भाग्यवंत, अर्चना कान्हेकर, ,संदिप कोटांगले, गुरुदास राऊत, लक्ष्मीकांत बोरकर, गुड्डू कापगते, प्रशांत मेश्राम यांनी कलाकृती सादर केली.