Home Social काटकुंभमध्ये शोककळा…. — हृदय शस्त्रक्रियेनंतर रविकुमार मालवीय यांचे निधन…

काटकुंभमध्ये शोककळा…. — हृदय शस्त्रक्रियेनंतर रविकुमार मालवीय यांचे निधन…

अबोदनागो एस.चव्हाण

  जिल्हा प्रतिनिधी अमरावती

चिखलदरा :- मेळघाट क्षेत्रातंर्गत चिखलदरा तालुक्यातील मौजा काटकुंभ येथील रहिवासी तथा सामाजिक क्षेत्रात परिचित असलेले स्व.रविकुमारजी मालवीय यांचे शुक्रवार दिनांक १६ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता नागपूर येथील रुग्णालयात हृदय शस्त्रक्रियेनंतर दुःखद निधन झाले. 

      त्यांच्या निधनाची बातमी समजताच काटकुंभ परिसरात शोककळा पसरली आहे.स्व.रविकुमारजी मालवीय हे शांत,मनमिळावू व नेहमी हसमुख चेहऱ्याचे धनी होते.सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात होते.

       त्यांच्या पश्चात पुत्र पियुष मालवीय काग्रेस,आई.पत्नी व लहानसी मुलगी असा परिवार आहे. 

       गावातील अनेक सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला होता.त्यांची अंतिम यात्रा शनिवार दिनांक १७ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघणार असून काटकुंभ मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

        त्यांच्या निधनाबद्दल ग्रामस्थ,मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली असून मालवीय कुटुंबीयांवर शोकसंदेशांचा वर्षाव होत आहे.

      “ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या….