Home देशविदेश राज्य संघटक संजय भोकरे यांना पोलीस संरक्षणाची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची...

राज्य संघटक संजय भोकरे यांना पोलीस संरक्षणाची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी….  — संजय भोकरे यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे… — संरक्षण देण्याचे तातडीने आदेश :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक..

मुंबई/सांगली:- भोकरे यांना मी पुर्णपणे ओळखतो,त्यांनी पत्रकारीता,शैक्षणिक,सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले असून अशा लोकांची सुरक्षा करणे हे आमच्या सरकारचे कामं आहे.यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत घटनेचा निषेध व्यक्त केला,महाराष्ट्र राज्य हे सुजलाम सुफलाम राज्य असुन गुंडागिरीचा बंदोबस्त करण्यासाठी आमच्या सरकारने या प्रकरणात लक्ष घातले असून पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडुन माहिती प्राप्त झाली आहे.

        पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा छडा लावण्यात यशस्वी ठरेल असा मला विश्वास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले. 

            महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक आणि ‘दैनिक जनप्रवास’चे समूह संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट सांगली पोलिसांनी उधळून लावला आहे.या प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून,त्यांच्याकडून पिस्तूल आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

            या घटनेच्या पार्श्वभूमीवर,संजय भोकरे यांना तातडीने राज्य भरात फिरताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी आज पत्रकार संघाने मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून केली आहे.

            यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महासचिव डॉ. विश्वास आरोटे,प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी,प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव मंत्रालय संपर्कप्रमुख विष्णू बुरे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ब्रँड अँबेसेडर संजय फुलसुंदर,आणि संघाचे सदस्य खंडूराज गायकवाड यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

       यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री.भोकरे यांना संरक्षण देण्याची मागणी मान्य केली.

रेकी करून हत्येचा प्रयत्न…..

     अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तूलं,चार जिवंत काडतूसं आणि इतर घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.विशेष म्हणजे,हे आरोपी फेब्रुवारी महिन्यापासून संजय भोकरे यांची ‘रेकी’ (पाळत ठेवणे) करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

        अंबाबाई तालीम संस्थेच्या जमिनी हडपण्याच्या उद्देशातून हा सर्व प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.

‘प्लॅन बी’ची भीती…..

        या कारवाईनंतर संजय भोकरे यांनी स्वतः ‘प्लॅन बी’ नुसार पुन्हा हल्ला होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे.यावरून संपूर्ण भोकरे कुटुंब गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट होत आहे.

पत्रकार संघाच्या प्रमुख मागण्या…..

      महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत.

       १) संजयय भोकरे यांना राज्यभर फिरावे लागते,यांच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेता,त्यांना राज्यभर कडेकोट पोलीस संरक्षण मिळावे.

        २) या कटामागील मुख्य ‘बोलविता धनी’ कोण आहे,याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.