शोषण
राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
वाढत्या घरगुती विज बिलामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून,महावितरण विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
घरगुती ग्राहकांना आकारण्यात येणारे विज दर शंभर यूनिट पर्यंत ३.९६ रु,तर १०१~३००यूनिट पर्यंत १०.८० रु.,तर हे दर व्यवसायिक विज दरांच्या तुलनेत अधिक असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सध्या महावितरणकडून आलेल्या विज बिलात विविध आकार,इंधन समायोजन शुल्क,कर व इतर अधिभार यामुळे सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.अनेक घरांमध्ये महिन्याला येणारे विज बिल अपेक्षेपेक्षा दुप्पट तिप्पट येत असल्याने नागरिकांमध्ये “बोंबा बोंब” सुरू आहे.
विशेष म्हणजे व्यवसायिक ग्राहकांसाठी काही श्रेणींमध्ये तुलनेने कमी दर दिसून येत असल्याने घरगुती ग्राहकांमध्ये संभ्रम व नाराजी वाढली आहे.“घर चालवायचे की विज बिल भरायचे?” असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
महागाई,बेरोजगारी आणि वाढते दैनंदिन खर्च यामुळे आधीच नागरिक हैराण असताना अवाढव्य विज बिलांनी त्यांची चिंता अधिक वाढवली आहे.ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी महावितरण कार्यालयात धाव घेत बिल दुरुस्तीची मागणी करणार असल्याचे बोलले जात आहे.
काही ठिकाणी नविन स्मार्ट मीटरमुळे बिल वाढल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत.ग्राहकांनी महावितरण प्रशासनाने घरगुती विज दरांचा फेरविचार करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा,अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल व रोषाचा भडका केंव्हाही उठू शकतो असे दृश्य पहायला मिळेल.
मात्र,घरगुती विज ग्राहकांचे विजदर वाढवून व विजबिलामध्ये चक्रव्याजवाढ दर नमूद करुन,घरगुती विज ग्राहकांचे शोषण करणारी व्यवस्थाच विज वितरण मर्या.कंपनीने सुरु केली असल्याचे दिसून येत आहे.





