Home Maharashtra दोन इंच पोटासाठी जीव धोक्यात…! — भर दुपारी विजेच्या खांबावर काम,सुरक्षा...

दोन इंच पोटासाठी जीव धोक्यात…! — भर दुपारी विजेच्या खांबावर काम,सुरक्षा साधनांचा अभाव…

     लक्षवेधी 

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

       कडक उन्हात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगारांचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. विजेच्या खांबावर चढून काम करणारा कर्मचारी कोणत्याही ठोस सुरक्षा साधनांशिवाय काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भर दुपारच्या उन्हात उंच खांबावर जीव मुठीत धरून काम करणाऱ्या या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

       सुरक्षा बेल्ट, हेल्मेट, हातमोजे यांसारखी आवश्यक साधने नसताना काम सुरू असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कामगार जीवाची बाजी लावत असल्याचे हे वास्तव मन हेलावून टाकणारे आहे.

         संबंधित विभागाने अशा कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देऊन कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.