Home Maharashtra चिमूर तालुकातंर्गत पाणी टंचाईकडे तहसीलदार आणि संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले...

चिमूर तालुकातंर्गत पाणी टंचाईकडे तहसीलदार आणि संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे? — महिला हैराण!…

     लक्षवेधी

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक

     चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुका येतो आहे.या तालुकातंर्गत बऱ्याच गावातील महिला पाण्याच्या समस्येने हैराण झालेल्या आहेत.महिलांना आवश्यक व पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यास ग्रामपंचायतीचे प्रशासक,ग्रामसेवक व पाणीपुरवठा यंत्रणा अपयशी ठरत आहेत.

     यामुळे चिमूर तालुक्यातील पाणी टंचाईच्या समस्यांकडे चिमूर तालुक्याचे तहसीलदार तथा चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी वेळीच लक्ष देवून पाणी समस्यांवर मात केली पाहिजे असे महिलांचे म्हणणे आहे.

       चिमूर तालुकातंर्गत बऱ्याच नळयोजना नाममात्र सुरु असून गावातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरलेल्या आहेत.याला कारण म्हणजे नळयोजनांचे काम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य पावरणे होय व अंदाजपत्रकीय आराखड्याप्रमाणे काम न करणे होय.

      याचबरोबर पाइपलाइन टाकताना योग्य दक्षता घेण्यात आली नसल्याने,वारंवार पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन फुटत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तद्वतच पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारपंप जळलेल्या अवस्थेत असताना,त्या वेळेत दुरस्त करण्याची तसदी ग्रामपंचायत,नगरपंचायत,नगरपरिषद स्तरावरुन घेतली जात नाही,असे दिसून आले आहे.

          परत्वे चिमूर तालुक्यातील अनेक गावात हातपंप बंद आहेत.हातपंप दुरुस्त करण्यासाठी आवश्यक निधी ग्रामपंचायत स्तरांवरुन जि.प.च्या शेष फंडात भरण्यात आला नसल्याचे,हातपंप दुरुस्ताईचे कामे ठप्प पडली आहेत.

    यामुळे पाणी समस्यांनी चिमूर तालुक्यातील महिला हैराण झालेल्या असून,दैनंदिन लागणारे पाणी आणायचे कुठून हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे आहे.