शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील मौजा मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहार पदाधिकाऱ्यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तथा दीपप्रज्वलन करून अभिवादनाने झाली..
यावेळी विहारापासून ते डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौकातून बुद्ध मूर्ती सह जयघोष करत,हातात मेणबत्ती पकडून शांततामय मिरवणूक सुगतकुटी कडे मार्ग क्रमन करण्यात आले.
सुगत कुटी येथे बोधिवृक्ष तथा महामानवांना अभिवादन करून सामुहिक बुद्धवंदना घेण्यात आली.या त्रिवेणी मंगलमय प्रसंगी बौद्ध जनातील उत्साह,आनंद द्विगुणित झाला होता.
समता,करुणा,विज्ञानवादी दृष्टीकोनातून मंगलमय जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या आपल्या मार्गदात्याला,तथागताला मनोभावे अभिवादन करण्यास आलेल्या उपस्थित जनसमुदायचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता खिर दानाने करण्यात आली.कार्यक्रमाला समस्त बौध्दजन तथा गावकरी उपस्थित होते.



