राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालय देऊळगाव येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संतोष ठलाल यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.
तसेच साहित्यिक, सामाजिक कवियत्री संगीता ठलाल यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, बाबासाहेबांच्या जीवनावर दोन शब्द बोलून अभिवादन केले.
त्या प्रसंगी वाचनालयाच्या सदस्य निर्मला ठलाल,सत्यभामा ठलाल, अनिता पटणे,छगण ठलाल, नंदिनी पटणे,संतोष ठलाल, संगीता ठलाल प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.



