राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उपक्रमाची पाहणी करण्यासाठी जि. प. गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे सर यांनी ग्रामपंचायत गेवर्धा येथे भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध विकासकामांची आणि ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी,जि. प.शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भेटीदरम्यान गटविकास अधिकारी श्री. धिरज पाटील सर, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. उराडे सर, विस्तार अधिकारी भोगे सर,कुळसंगे सर, उपविभागीय अभियंता जि. प. बांधकाम मडावी सर, शाखा अभियंता भोयर सर, शाखा अभियंता नाकाडे मॅडम उपस्थित होते.
याप्रसंगी नुकत्याच पार पडलेल्या गडचिरोली पोलीस दलात निवड झालेल्या प्रवीण पैकुजी कुळसंगे आणि सुमेध खुशाल रामटेके यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे सर यांचे हस्ते शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद,पोलीस पाटील भाग्यरेखा वझाडे,तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई, ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, ग्रामसभा अध्यक्ष सुरेश पुसाम, ग्रामसभा सचिव सुधीर बाळबुद्धे, ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा मस्के, दिनेश कावळे, मुकेश बोरकर, राहुल नखाते, विनोद गावळे, ज्ञानेश्वर मस्के, अमिता नहामुर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी अभियान संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी देवानंद भोयर आणि ग्रा. पं. सदस्य रोशन सय्यद यांनी माहिती दिली.



