Home Social गेवर्धा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

गेवर्धा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

     राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा…

       युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सव गेवर्धा येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

     मानवी हक्कांचे कैवारी,जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ,कायदेपंडित,राजनीतिज्ञ,लेखक,समाज सुधारक,स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे जनक,शोषितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीची वर्षानुवर्षंची श्रूखंला तोडणारा महायोध्दा,उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य,तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा,अस्पृश्यता मिटविण्यासाठी चंदनापरी आपला जीव झिजवणारे,बहुजनांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे,समतेसाठी सत्याग्रह करणारे हाडामासाचा मनुष्य आपल्या जीवन कालावधीमध्ये किती प्रचंड कार्य करू शकते हे बाबासाहेबांच्या कर्तृत्वावरून लक्षात येते.

      विश्व वंदनीय डॉ.बाबासाहेब सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत,असे प्रतिपादन डॉ.जगदिश बोरकर यांनी केले.

      ते गेवर्धा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

      कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणापासून करण्यात आली.पुंडलिकजी नेवारे महाराज यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.

      विशेष अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी संजय रामटेके,प्रमुख पाहुणे ग्रा.प.सदस्य रोशन सय्यद,सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीकांत नागीलवार,तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू बारई,माजी सरपंच हेमंत शिडाम,पोलिस पाटील भाग्यरेखा वझाडे,सदस्य कल्पना कांबळे,राजेंद्र कुमरे अविका उपसभापती,परशराम लाडे,भोला पठाण,नितीन कुथे, देवराव सुकारे,चरणदास मडावी,सुधीर बाळबुधे,चंद्रकांत मसराम,डॉ जयदेव टेंभुर्णे,रमेश कांबळे,मधुकर पाटील शेंडे,तेजराम बुद्दे,गिरीश मेश्राम,कृष्णा मस्के ,सुरेश पुसाम आदी मान्यवर उपस्थितीत होते.

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत मेश्राम यांनी तर प्रास्तविक खुशाल रामटेके यांनी केले,तर आभार नेपाल जनबंधू यांनी मानले.

      मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली,नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती आधारित भीम गीतांचा कार्यक्रम व स्नेहभोजन अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले.

           डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मोत्सव कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष मंगेश इंदुरकर,मनोज ढवळे,नरेश अंबादे.राष्ट्रपाल बांबोळे,सिद्धार्थ जनबंधू,नामु बोरकर,अतुल अंबादे,आरती ढवळे,तथा सर्व समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.सर्व समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.