शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
सामाजिक,क्रीडा शैक्षणिक,संगीत साहित्यिक व कला क्षेत्रातील कलावंतांना सदैव प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका समाजसेविका मायाताई कोसरे व जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे यांच्या सुचनांच्या अनुषंगाने चंद्रपूरच्या नविन महिला जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे आज सोमवारी दुपारी सहज सुचलंच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.
या वेळी चंद्रपूरच्या योग शिक्षिका तथा समाजसेविका रंज्जू दिलीप मोडक,सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर,अभियंता प्रियंका गायकवाड,सेवानिवृत्त प्रा.लता हिवरे,कवयित्री प्रियंका बेन्द्रे,प्रियंका चिताडे व अन्य सदस्यां उपस्थित होत्या.



