Home Maharashtra चिमूर तालुक्यातील वाळू,मुरुम तस्करीचे धक्के महाराष्ट्र सरकारला केव्हा बसणार? — सहा...

चिमूर तालुक्यातील वाळू,मुरुम तस्करीचे धक्के महाराष्ट्र सरकारला केव्हा बसणार? — सहा महिन्यांतंर्गत वाळू तस्करीचे जवळपास ४ अब्ज ३२ कोटी रुपयांच्या महसूलांचे नुकसान? तर ९ वर्षात ३८ अब्ज ८८ करोड रुपयांचे महसूलचे नुकसान? — म्हणूनच चिमूर तालुक्यातील अवैध धंद्दयांकडे केले जाते जाणिवपूर्वक दुर्लक्ष?.. — ९ वर्षाच्या काळात किती रुपये कुणी कमावले आणि अब्जो रुपयांचा महसूल कुणी बुडवला?

 रोखठोक

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

       चिमूर तालुकातंर्गत १२ महिने सातत्याने वाळूची व मूरुमाची तस्करी सुरु राहतयं.सदर वाळू व मूरुम तस्करीकडे संबधित अधिकाऱ्यांद्वारे आणि आमदारांद्वारे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं!

        यामुळे चिमूर तालुक्यात वाळू व मूरुम तस्करी अंतर्गत माफीयांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीतील हात भयंकर खोल रुजले असल्याचे दिसून येतंय.

                         भाजपाच्या सत्ताकाळात चिमूर तालुक्यात जिकडे-तिकडे सर्व अवैध धंदे प्रचंड प्रमाणात सुरु असताना सर्व अधिकारी आणि आमदार किर्तीकुमार ऊ चूप बसलेले आहेत.याचा अर्थ महाराष्ट्र राज्य महसूल विभागातील मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह,महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचा आशिर्वाद चिमूर तालुक्यातील अवैध धंद्द्यांना मिळत आहे असे मानायचे काय?

       याचबरोबर वाळू तस्करीसह चिमूर तालुक्यात अवैधरित्या देशी दारुची विक्री,सट्टा व्यवसाय आणि मूरुम तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असताना पोलिस विभाग आणि आमदार किर्तीकुमार भांगडिया हे मनानी आणि कर्तव्यांनी पंगू झाले असल्याचे दर्शवित आहे.

                यामुळे चिमूर तालुक्यातील सर्व अवैध व्यवसायांना महाराष्ट्र राज्याच्या गृह व महसूल विभागाचे आशिर्वाद आहेत काय? याबाबत आता संशय येऊ लागला आहे.

वाळू व मूरुम तस्करी व त्या बाबत हिशोब…..

       मागील ९ वर्षांपासून चिमूर तालुक्यात अवैध उत्खननातंर्गत वाळू व मुरुमांची तस्करी सातत्याने सुरू आहे.एका दिवसाला २०० ब्रास किंवा यापेक्षाही जास्त वाळूची चोरी दैनंदिन होत आहे.मुरुमाची तस्करी तर मोठ्या प्रमाणात झाली आहे व होत आहे.

       सहा महिन्यांतंर्गत पर दिन २०० ब्रास वाळूची चोरटी तस्करी म्हणजे ०६ महिन्यात ३६ हजार वाळू ब्रासची तस्करी अंतर्गत चोरी होत आहे.

       या ३६ हजार ब्रास वाळूचा दंडात्मक महसूल होतोय ४ अब्ज ३२ करोड रुपये,तर ९ वर्षातंर्गत दंडात्मक महसूल होतोय ३८ अब्ज ८८ करोड रुपये.

        चिमूर तालुकातंर्गत मूरुम तस्करीची तर गिनतीच नाही,९ वर्षात जवळपास ५ अब्ज रुपयांची दंडात्मक तस्करी झाली असती,याची खात्री आहे.

      याचा अर्थ,मागील ९ वर्षाच्या काळात ४३ अब्ज ८८ करोड रुपयांचा महसूल चिमूर तालुकातंर्गत बुडविला गेला आहे.

       आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि त्यांच्या कार्यकाळ….

        आमदार किर्तीकुमार भांगडिया हे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले तेव्हापासून चिमूर तालुक्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्दयात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि अवैध धंद्दयांना खुलेआम संरक्षण मिळाले आहे व मिळत आहे.

           यामुळे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या पुढाकारातंर्गत,आशिर्वादातंर्गत,संरक्षणातंर्गत,आणि सत्तेच्या व पदाच्या दुरुपयोगातंर्गत,दुर्लक्षातंर्गत चिमूर तालुक्यातील वाळू व मूरुमांची तस्करी त्यांनी प्रचंड प्रमाणात होऊ दिली,असा दाट संशय आहे.

            याचबरोबर चिमूर तालुक्यात अवैध धंद्दयांची मोठ्या प्रमाणात वाढ,त्यांच्याच कार्यकाळात झाली आहे.यामुळे प्रश्न हा पडतो की,अवैध वाळू व मूरुम तस्करी अंतर्गत,अवैध धंद्दयांतंर्गत अब्जो रुपयांची होणारी उलाढाल कुणाच्या खिशात पडते आणि या अवैध धंद्द्यातंर्गत कमाईचे भागिदारी कोण आहेत?

.       आमदार व अधिकारी कशासाठी?….

     चिमूर तालुकातंर्गत अवैध धंदे सुरु असताना त्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्दयाकडे आमदार आणि अधिकारी दुर्लक्ष करीत असतील आणि अब्जो रुपयांचा महसूल बुडवित असतील तर आमदार आणि अधिकारी कशासाठी हा प्रश्न पडतो आहे.

अवैध कमाईतून विविध कार्यक्रमांना रुपये दिले जातात काय?…..

       चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत विविध समाजाद्वारे विविध सामाजिक कार्यक्रम घेतले जातात.याचबरोबर,”गणपती उत्सव,जयंती उत्सव,पुण्यतिथी कार्यक्रम व इतर उत्सव मोठ्या प्रमाणात होतात.

          या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना अवैध चोरट्या मार्गाने कमावलेले रुपये आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या कडून मोठ्या प्रमाणात दिले जातात काय? हा प्रश्न खुलासेवार विचार करण्यास अंतर्मुख करतो आहे.