राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६ अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या कुरखेडा मंडलातर्फे श्री भगवान महादेव देवस्थान, अरततोंडी (ता. कुरखेडा) येथे १२ व १३ एप्रिल रोजी आयोजित दोनदिवसीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी महादेवाची विधिवत पूजा करून केले.
या शिबिरात सात सत्रांद्वारे कार्यकर्त्यांना भाजपचा इतिहास, संघटना विस्तार, वैचारिक अधिष्ठान, सरकारची कामगिरी, बुथ व्यवस्थापन व सोशल मीडिया यांचे मार्गदर्शन होईल. पहिल्या दिवशी सकाळी ९.३० ते १०.३० नोंदणी व चहा-नाश्ता, ११ वाजता उद्घाटन सत्रानंतर दुपारी वैचारिक अधिष्ठान (चंदाताई कोडवते), इतिहास व विकास (सदानंदजी कुथे), कार्यविस्ताराची दृष्टी (बाबूरावजी कोहळे), कार्यापद्धती (मधुकरजी भांडेकर) व सोशल मीडिया (चेतनजी कोलते) अशी सत्रे असतील.
माजी आमदार कृष्णा गजबे म्हणाले, “आदर्श कार्यकर्ता घडविण्यासाठी असे प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पक्षाच्या वैचारिक अधिष्ठानावर आधारित हे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना संघटनेत मजबूत करेल व बुथ मजबूत करण्याचे शास्त्र शिकवेल.”
यावेळी भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत वाघरे, महादेव गड देवस्थानचे अध्यक्ष व प्रथम भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. ते.ना.बुद्धे, तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, ज्येष्ठ नेते विलास गावंडे, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष बबलू हुसेनी, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक एडवोकेट उमेश वालदे, जिल्हा सचिव रूपाली गावडे, महिला शहर अध्यक्ष कल्पना मांडवे, महामंत्री प्रा. विनोद नागपूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेमुळे कुरखेडा मंडलातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून, पक्ष विस्तार व स्थानिक विकासासाठी नवी दिशा मिळेल.
प्रास्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये संचालन आभार विनोद नागपूरकर यांनी केले.
यावेळी माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, महादेव गड देवस्थानचे अध्यक्ष तथा प्रथम भाजपा तालुका अध्यक्ष कुरखेडा डॉ. ते.ना.बुद्धे, भाजप तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, ज्येष्ठ नेते विलास गावंडे, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष बबलू हुसेनी, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक एड. उमेश वालदे, जिल्हा सचिव रूपाली गावडे, भाजपा महिला शहर अध्यक्ष कल्पना मांडवे, महामंत्री प्रा. विनोद नागपूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील भाजप पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव फाये यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. विनोद नागपूरकर यांनी केले.



