Home Maharashtra दर्यापूरातील आंबेडकर पार्कमधिल पुतळ्याची उंची वाढवून निवडणुकीत दिलेले आश्वासन नगराध्यक्ष यांनी पूर्ण...

दर्यापूरातील आंबेडकर पार्कमधिल पुतळ्याची उंची वाढवून निवडणुकीत दिलेले आश्वासन नगराध्यक्ष यांनी पूर्ण करावे, रिपाई (गवई )गटाचे निवेदन, आंदोलनाचा इशारा….

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

         दर्यापूर शहरातील मध्यवस्तीत जुन्या नगर परिषद जवळ असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क मधिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवून देण्यात येईल असे आश्वासन नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ मंदाकिनी भारसकाळे यांनी शहरवासियांना दिले होते. दिलेले आश्वासन नगराध्यक्ष यांनी पूर्ण करुन त्याची अंमलबजवानी करावी अश्या आशयाचे निवेदन रिपाईचे (गवई गट) तालुकाध्यक्ष अनिल गवई यांच्या नेतृत्वात (9) मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना देण्यात आले.

        सध्यस्थितीत पार्कची अत्यंत दयनिय दुरावस्था झाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मधिल पुतळ्याची उंची अत्यंत कमी आहे. पार्कच्या भिंती उंच व पुतळ्याची उंची कमी असून पार्कची अवस्था खराब आहे. या पार्क मध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. निवडणुकीत मतदारांना नगराध्यक्षा यांनी पार्क मधिल पुतळ्याच्या उंची बरोबरच अन्य सोयी उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन दिले होते.

         मात्र अद्यापही या पार्क मधिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविली नाही व अन्य सोयीसुद्धा करुन दिल्या नाहीत. नगराध्यक्षा यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन एक महिन्यात पाळावे अन्यथा रिपाई (गवई गट) च्या वतीने 25 मे रोजी आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

         यावेळी तालुकाध्यक्ष अनिल गवई यांच्यासह रिपाई (गवई गट) विजय वर्धे, विनोद गवई, शुभम कोरे, सुरज चौधरी, कुलदीप वानखडे, राम गवई,वैकेत्वास, जामनिक मामा, दिनेश गवई, बाळू गवई, निलेश नवरे,राजू गवई, प्रविण नवरे, आगासे, मोहन खंडारे, कुणाल गावंडे, नितीन तायडे उपस्थित होते.