राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी (रब्बी उन्हाळी) हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकासोबतच मका या पिकाची सुद्धा मोठया प्रमाणात लागवड केलेली आहे.मात्र शासणाच्या वतीने आधारभूत खरेदी केंद्रा अंतर्गत केवळ धान या पिकाची खरेदी करण्यात येत असते.
यावर्षी कुरखेडा तालुक्यात सिंचनाच्या पाण्याची अडचण लक्षात घेता मोठ्या प्रमाणात मका या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. मात्र आधारभूत खरेदी केंद्राअंतर्गत धान पिकाचीच खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी बांधवाना मातीमोल भावात खाजगी व्यापारांना मका पिक विकावे लागत असल्याने शेतकरी बांधवांची मोठी आर्थिक नुकसान होत आहे.
त्याचप्रमाणे उन्हाळी धान्य खरेदी केंद्र हे सुद्धा विहित मुदतीत सुरु होत नसल्याने उन्हाळ्यात वातावरणातील अचानक बदलामुळे पावसाची शक्यता निर्माण होत असल्याने शेतकरी बांधवाकडे साठवणूकीसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने धान्याची मोठी नुकसान होत असते.त्यामुळे विहित मुदतीत उन्हाळी धान्य खरेदी केंद्र आणि सोबतच मका या पिकाची खरेदी करण्यात यावी.
या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना आणि उपप्रादेशिक व्यवस्थापक यांना प्रशासक सुषमा मडावी, माजी ग्रा. पं. सदस्य रोशन सय्यद, तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई, ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, ग्रामसभा अध्यक्ष राजेंद्र कुमरे, ग्रामसभा सचिव सुधीर बाळबुद्धे उपस्थित होते.



