Home Political तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन कार्यकारणी जाहीर..!

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन कार्यकारणी जाहीर..!

राजेंद्र रामटेके 

 विशेष प्रतिनिधी 

कोरची : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोरची तालुक्यातील नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी क्रांतीदादा केरामी यांची निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारणीमुळे तालुक्यात पक्ष संघटन अधिक बळकट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

         तालुका उपाध्यक्षपदी योगेश धमगाये,तर महासचिवपदी डॉ.माणिक गहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

        सहसचिवपदी राजेंद्र शहारे यांची निवड झाली आहे. कोरची शहर अध्यक्ष म्हणून रुपेश नंदेश्वर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

         राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी च्या तालुका अध्यक्ष पदी कुमारसाय बोगा यांची नियुक्ती करण्यात आली.

          महासचिव पदी रामदास उईके यांची नियुक्ती करण्यात आली.

          तालुका कार्यध्यक्ष मनुन चंदरसाय कोल्हे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

           एसी सेल आघाडीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ उंदीरवाडे तर उपाध्यक्षपदी संघपाल वालदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवती आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी रेश्मा मडावी आणि सचिवपदी मीनाक्षी मडावी यांची निवड करण्यात आली आहे.

          कोटगुल क्षेत्र अध्यक्ष म्हणून लिता नरोटे व सचिवपदी सतीसावित्री हिडामी यांची निवड झाली आहे. ओबीसी सेल आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी पूनमचंद लाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

          राष्ट्रवादी आदिवासी काँग्रेस आघाडीत मानूजी कुमरे (अध्यक्ष), सुग्रीव हलामी (उपाध्यक्ष), बसन काटेगे (सह-अध्यक्ष), सोमजी गावळे (महासचिव), तिवारी गंगाकाचूर (सचिव) यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटन सचिवपदी श्रीराम कल्लो, संघटन मंत्रीपदी प्रकाश मडावी, तालुका संघटक म्हणून लालसाय पोरेटी आणि कार्याध्यक्ष म्हणून प्यारेलाल नैताम यांची निवड करण्यात आली आहे.

          तसेच, कोरची तालुक्यात विविध बूथ प्रमुखांचीही नियुक्ती करण्यात आली असून संघटन विस्तारावर भर देण्यात येत आहे.

          राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी सुषमा कमरो, कार्याध्यक्षपदी यशोदा कल्लो आणि संघटकपदी चंद्रकांता उंदीरवाडे यांची निवड झाली आहे.

           नवीन कार्यकारणीच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार तालुका अध्यक्ष क्रांतीदादा केरामी यांनी व्यक्त केला आहे.