Home Political भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त चिमूर येथील नवी वाडा परिसरात ध्वजवंदन सोहळा.‌‌..

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त चिमूर येथील नवी वाडा परिसरात ध्वजवंदन सोहळा.‌‌..

      रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

       आज दिनांक ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त चिमूर येथील नवी वाडा परिसरात ध्वजवंदन सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. 

         चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री.किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

          यावेळी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,”भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नाही,तर हा राष्ट्रनिर्माणाचा संकल्प आहे.

           पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय विचारापासून ते आजच्या ‘सबका साथ,सबका विकास’ या तत्त्वापर्यंत पक्षाने नेहमीच सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले आहे. 

           प्रत्येक कार्यकर्ता हाच पक्षाची खरी ताकद आहे.आपण सारे मिळून राष्ट्रहित,समाजहित आणि चिमूर विधानसभेच्या विकासासाठी निष्ठेने कार्यरत राहू — हाच या स्थापना दिनाचा खरा संकल्प आहे.

            या सोहळ्यास राजू झाडे,संजय नवघडे,गजानन गुळधे,मनीष तूमपल्लीवार,कमल असावा,प्रशांत चिडे,बंटी वनकर,प्रवीण गणोरकर,कमल असावा,ओमप्रकाश गणोरकर,श्रेयस लाखे,कलीम शेख,बालू पिसे,पप्पू शेख,पलाश तळवेकर,निखिल डोहिजल,प्रकाश असावा,बादल भडगे,अमित जुमडे, नरेंद्र हजारे,योगेश नाकाडे,तुषार शिंदे,नितीन कटारे,भूषण डाहुले,गोलू भरटकर,अर्चित सातपुते,विनोद ढाकुलकर,गजानन जांभुळे, अभिषेक जाजु,गुणवंत चटपकार,प्रमोद श्रीरामे,शुभम भोपे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.