Home Maharashtra अंतरगाव उपकेंद्राचा ट्रान्सफॉर्मरची तातडीने दूरूस्ती करा :- आमदार रामदास मसराम यांचे निर्देश… 

अंतरगाव उपकेंद्राचा ट्रान्सफॉर्मरची तातडीने दूरूस्ती करा :- आमदार रामदास मसराम यांचे निर्देश… 

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी

           कुरखेडा तालूक्यातील अंतरगाव येथील ३३ के.व्ही. विद्यूत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे परिसरातील विद्यूत पूरवठा प्रभावित झालेला आहे दूरूस्ती करीता विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत आलेला आहे. सदर समस्या लक्षात येताच आमदार रामदास मसराम यांनी शेतकर्यासह येथे भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने दूरूस्ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

              या परीसरात रब्बी हंगामात धान व मका या पीकाची मोठी लागवट करण्यात आली आहे.सद्या पीकाला पाण्याची गरज आहे. मात्र मागील काही दिवसांपासून अंतरगाव विज उपकेंद्रात बिघाडामूळे कृषीपंप निकामी होत पीके करपण्याचा धोका निर्माण झाला. 

           समस्येची जाण होताच आमदार रामदास मसराम यांनी उपकेंद्राला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्युत वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच मुख्य अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क साधून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या व वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत सुरू करण्याचे निर्देश दिले.

             तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कामात कोणतीही दिरंगाई होऊ नये असे सांगितले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटिल नाट, माजी प स सभापती गिरिधर तितराम, माजी नगरसेवक उस्मान पठान, भावेश मुंगनकर, रवि राउत, डोमा जमदाळ, मुकुंदा नहामुरते, बिनविसार पगाडे, गजेंद्र दरवडे, प्रल्हाद दरवडे, ज्ञानेश्वर मसराम, चेतन मेश्राम, महादेव नागोसे, खुशाल नहामुरते, सुशील कन्नाके, भजन जमदाळ, दिवाकर मारगाये तसेच स्थानिक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोट…

         शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेत बिघाड निर्माण झालेल्या ट्रान्स्फार्मरची‌ दूरूस्ती करण्यात आलेली आहे व सद्या टेस्टीगं सूरू आहे. रात्री किंवा उद्या मंगळवार रोजी विद्यूत भार ट्रान्सफॉर्मरवर टाकत पूर्ण क्षमतेने ट्रान्सफॉर्मर कार्यान्वीत करण्यात येईल.

      मिथून मूरकूटे

उपविभागीय अभियंता विद्यूत वितरण कंपनी कूरखेडा