Home Maharashtra पत्रकारावरील अन्याय दूर करीत वृत्तपत्रांना दरवाढ द्या… — व्हाईस ऑफ मीडियाची...

पत्रकारावरील अन्याय दूर करीत वृत्तपत्रांना दरवाढ द्या… — व्हाईस ऑफ मीडियाची कूरखेडा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याकडे मागणी…

     राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

         पत्रकारावर होणारे अन्याय थांबविणे तसेच राज्यातील सर्व वृत्तपत्रांचा शासकीय जाहीरातीना १५०% दरवाढ तसेच प्रशासकीय धोरणांबाबत विविध मागण्यांना मान्यता देण्यात यावी याबाबतचे निवेदन आज दि ६ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना कूरखेडा तहसीलदार यांच्या मार्फत पाठविण्यात आले.

           निवेदनात राज्यातील वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असून जनतेपर्यंत शासनाच्या योजना, निर्णय आणि धोरणे पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत आहे मात्र मागील काही वर्षांत वृत्तपत्र उद्योगावर आर्थिकदृष्ट्या मोठा ताण निर्माण झाला आहे.याबाबत मागे अनेकदा व्हॉईस ऑफ मीडिया च्या वतीने शाशनाला निवेदन देत आंदोलन सूद्धा करण्यात आले आहे. मात्र शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही त्यामुळे लोकशाहीचा चौथ्या स्तंभांचा अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे, निकोप लोकशाही करीता या चौथ्या स्तंभांचे अस्तित्व आवश्यक आहे करीता या लोकशाही राज्यात चौथ्या स्तंभांला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

           याशिवाय पत्रकारांचा अनेक समस्या सह राज्यातील पत्रकारांची ठिकठिकाणी पोलीस, गुंड तसेच राजकीय लोकांकडून होत असलेली मूस्कटदाबी या सर्व घटनांचा निषेध करताना ‘व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी सूद्धा निवेदनात करण्यात येत मागण्या संदर्भात योग्य निर्णय न झाल्यास संघटनेचा वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा सूद्धा निवेदनात देण्यात आला आहे.

         निवेदन नायब तहसीलदार वैभव आंबेकर यांचा मार्फत शासनाला पाठविण्यात आले याप्रसंगी व्हाॅईस ऑफ मिडीयाचे तालुका अध्यक्ष विजय भैसारे, उपाध्यक्ष रमेश बोरकर, सचिव विजय नाकाडे,सिराज पठाण, महेंद्र लाडे,राम लांजेवार, कैलाश उईके, विनोद नागपूरकर,राकेश चव्हाण,शालीकराम जनबंधू, गजानन भोयर आदि हजर होते.