राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
जय श्री राम हनुमान मंदिर, आलापल्ली येथे श्री राम नवमी निमित्त माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कडून महाप्रसाद वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. तसेच विधीवत पूजा-अर्चना करून श्रीरामांच्या चरणी प्रार्थना अर्पण करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष नागेश मडावी तसेच तिरुपती मडावी, योगेश तलांडे, आकाश राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला.



