भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय थुल सर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.राजू किरमीरे, डॉ.विणा जम्बेवार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी डॉ.थुल सरांनी उपस्थित सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा प्रदान करून सर्वांनी मराठी भाषा समृद्ध करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले तसेच उपस्थितांनी मराठी भाषेचा इतिहास,भवितव्य,संधी व आव्हाने या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.गणेश चुदरी तर आभार प्रदर्शन प्रा.मिनाक्षी खोब्रागडे यांनी केले.
यावेळी डॉ.पंढरी वाघ, डॉ. हरीष लांजेवार, डॉ.दामोधर झाडे, प्रा.ज्ञानेश बनसोड, डॉ.संजय मुरकुटे, डॉ.सचिन धवनकर,डॉ.प्रवीण गोहणे, प्रा.मांतेश तोंडरे, डॉ. नितेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा.निवेदिता वटक, प्रा. कैलाश खोब्रागडे, प्रा.वसंत आवारी,प्रा.विराग रणदिवे,प्रा भाविकदास करमनकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.संदीप मानापूरे, श्री.हरिश्चंद्र गोहणे, श्री.गणेश लांबट,श्री.भास्कर कायते, श्री.राकेश बोंगीरवार यांच्यासह श्री.भास्कर वाढणकर, श्री.बालाजी राजगडे यांनी मोलाचे सहकार्य केले.



