दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
महाराष्ट्रात सावकार पाशामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः किडनी विकण्याची वेळ येत आहे,याहून मोठं दुर्दैव काय? ही केवळ बातमी नाही,तर महाराष्ट्राच्या अंतरात्म्याला हादरून टाकणारी घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याने फक्त १ लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७४ लाख रुपये सावकाराला दिले. ट्रॅक्टर गेला,शेती गेली,तरी कर्ज फिटेना.शेवटी कुटुंब वाचवण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागला.हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे,असं माझं ठाम मत आहे.
मी स्वतः पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला परदेशातून मायदेशी परत आणले.पण प्रश्न आहे की अशा रॅकेट्सना संरक्षण कोण देत आहे? दिल्लीपासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या या किडनी रॅकेटमध्ये एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.सरकार त्या डॉक्टरला अटक करण्याचे धाडस दाखवणार का?,असा प्रश्न आज विधिमंडळात उपस्थित केला.
या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर Maharashtra Control of Organised Crime Act (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे. संघटित गुन्हेगारीला साध्या कलमांनी नाही, तर कठोर कायद्यानेच उत्तर द्यावे लागेल.
ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष किडनी गमावून बसला,ते कुटुंब आज उघड्यावर आहे. त्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून किमान १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर झाली पाहिजे.
शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे.त्याला सावकारांच्या पाशात ढकलणाऱ्या व्यवस्थेविरोधात आमचा लढा आहे.



