Home Maharashtra राज्य परिवहन चिमूर आगारात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी…

राज्य परिवहन चिमूर आगारात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

चिमूर :- 

         राज्य परिवहन चिमूर आगारात शासनाच्या पत्रानुसार 20 फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकारितेचे जनक आणि समाज सुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान राज्य परिवहन चिमूर आगाराचे व्यवस्थापक प्रमुख रोशन मेहर यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार भरत बंडे,नवभारतचे पत्रकार इमरान कुरेशी तर दखल न्युज भारत,दैनिक हितवाद,तथा पब्लिक पोस्टचे पत्रकार रामदास ठुसे हे प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते.

        सदर कार्यक्रमात दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजकुमार चुनारकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केले.भारतातील ब्रिटिश राजवटीत ते या वृत्तपत्राचे संपादक होते.या वर्तमानपत्रातून त्यांनी प्रबोधनाचे कार्य केले असे मार्गदर्शन केले. 

        या कार्यक्रमाचे संचालन रा.प.वरिष्ठ लिपिक होमराज शिडाम यांनी केले तर आभार कु.नेहा मेश्राम यांनी मानले.