रामदास ठुसे
विशेष प्रतिनिधी
चिमूर :-
दिनांक 18 फेब्रुवारी ला ग्रामस्तरावरील महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या समता महिला प्रभागसंघ खडसंगीचे वार्षिक अधिवेशन मौजा जामणी येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
या अधिवेशनात विविध ग्रामसंघाचे महिला प्रतिनिधी,पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता महिला प्रभागसंघ अध्यक्ष सौ.वंदना गुढधे तर प्रमुख पाहुणे प्रवीण भांडारकर जिल्हा अभियान व्यवस्थापक जिल्हा परिषद चंद्रपूर उपस्थित होते.पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अधिवेशनात गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा सादर करण्यात आला.महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
आर्थिक साक्षरता,स्वयंरोजगार निर्मिती,शेतीपूरक व्यवसाय आणि सामाजिक उपक्रम याबाबत विशेष चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी प्रभागसंघ सचिव सौ.उषा पेंदाम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसखी,ग्रामसंघ व बचत गटाचा सत्कार करण्यात आला.
तसेच आगामी वर्षासाठी विविध विकासात्मक योजनांची रूपरेषा जाहीर करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून सौ.ललिता उईके सरपंच जामणी,सौ.कल्पना धोटे सरपंच आमडी,सौ.उषा पेंदाम माजी प्रभागसंघ सचिव,अर्चना बोनसुले BMM, विवेक हरणे BM,रामदास नैताम उपसरपंच जामणी,अंकुश शिवरकर,इंदरसह मडावी, सुनील मडावी सर्व सदस्य ग्रामपंचायत,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी,वनहक्क समिती पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी,तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.
यादरम्यान महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांची कबड्डी स्पर्धा ठेवण्यात आली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.विजया केराम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.दिशा कोयचाडे यांनी केले.
अधिवेशनामुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल,असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिवर्तन ग्रामसंघ जामणी,श्री.पुंडलिक गेडाम पशु व्यवस्थापक,शितल थुटे प्रभागसंघ व्यवस्थापक,सर्व ग्रामसखी व गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.



