रोखठोक
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
आमदारांचे अधिकार काय असतात याची माहिती बऱ्याच जनतेला नाही.यामुळे महाराष्ट्र राज्यातील आमदार हे आपापल्या पध्दतीने कार्य करतात असे लक्षात येते आहे…
परंतु ज्या मतदारांनी किर्तीकुमार भांगडिया यांना आमदार बनविले आणि ज्या नागरिकांनी त्यांना आमदार बनविण्यासाठी श्रम घेतले,ते नागरिक अवैध धंदे करावेत आणि तेच मतदार अवैध धंद्यातंर्गत भरडे जावेत हे योग्य आहे काय?हा गंभीर प्रश्न त्यांना आहे.
आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात चिमूर तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले व सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना प्रशासकीय संरक्षण सुध्दा मिळाले.हिच महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या बाबतीत शोकांतिका आहे.
वाळू व मुरुमांचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन,देशी व गावठी दारुची जोमाने अवैध विक्री,सट्ट्यांची अवैध अड्डे चिमूर तालुक्यात सुरू आहेत.
अशा अवैध धंदेवाईकांच्या धंद्यांना अनुसरून चुप राहण्याचे व शांत बसण्याचे काम चिमूर तालुक्यातील महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी करीत आहेत.असे असताना अवैध धंद्याच्या अनुषंगाने आमदार किर्तीकुमार भांगडिया यांची अधिकारवाणी कधीच कडाडली नाही.
चिमूर तालुक्यात अवैध धंदे जोमाने सुरू असताना आमदार किर्तीकुमार भांगडिया हे चुप राहण्यातच स्वत:ला धन्य मानतात असेही दिसून आले.
जबाबदार लोकप्रतिनिधी हे त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी,संरक्षणासाठी,सर्वकश उन्नतीसाठी कार्य करीत नसतील आणि अधिकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्यासाठी सुचना देत नसतील तर त्यांच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा जनतेला काय उपयोग?
आमदार किर्तीकुमार भांगडिया हे आपल्या मतदारसंघात कामे मंजूर करतात,मोठमोठाले कार्यक्रम घेतात.पण,आपल्या मतदारसंघातील अवैध धंदे बंद करु शकत नाही,या त्यांच्या कर्तव्याला काय म्हणावे?
आमदार आणि त्यांची कर्तव्य…..
आमदार (MLA) हे विधानसभेचे सदस्य म्हणून राज्याच्या कायदेमंडळात,पोलीस,आरोग्य,शिक्षण,शेती आणि स्थानिक संस्थांशी संबंधित कायदे करतात,कायद्यात दुरुस्ती करतात व धोरणांवर चर्चा करतात.महत्त्वाची कायदेविषयक कामे पार पाडतात.
ते आपल्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सभागृहात मांडतात,निधीचा योग्य वापर करून जनहिताची कामे पूर्ण करतात,तसेच लोक आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
आमदार आपल्या भागातील रस्ते,पाणी,शिक्षण,आरोग्य यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आमदार निधी (MLA Fund) योग्य वापरतात असे सुचक वाक्य आहे.
विधानसभा अधिवेशनात मतदारसंघातील लोकांच्या समस्या मांडणे,सरकारच्या धोरणांवर प्रश्न विचारणे व चर्चेत भाग घेणे हे सुद्धा आमदारांचे कर्तव्य आहे.
तद्वतच जनप्रतिनिधी म्हणून लोकांच्या अपेक्षा समजून घेणे व त्या सरकारपर्यंत पोहोचवणे.लोकाभिमुख कामे करताना शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि मतदारसंघातील विकासकामांवर देखरेख ठेवणे हे देखील त्यांची जबाबदारी आहे.
आमदारांनी आपले काम प्रामाणिकपणे,पारदर्शकतेने आणि नैतिक तत्त्वांना अनुसरून करणे ही संविधानाशी निगडित त्यांची जबाबदारी असते…
म्हणूनच आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी कामे मंजूर करुन आणण्या व्यतिरिक्त दुसरे लोकांच्या हितासाठी कोणते कामे केलीत आणि लोकांच्या,बेरोजगारांच्या,मजूरांच्या,विद्यार्थ्यांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी सभागृहात किती मुद्दे मांडलीत,याची माहिती ते मतदारसंघातील जनतेला खुलासेवार देतील काय?हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे…
आपल्या मतदारसंघातील लोकांच्या मुलभूत व अत्यावश्यक समस्या कधी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी समजून घेतल्यात काय?
लोकांच्या मुलभूत अधिकारांवर व मुलभूत जिवनावश्यक समस्यांवर अवैध धंदे आघात करत असताना आमदार चुपचाप राहतात,हे त्यांच्या लोकप्रतिनिधीला साजेसे नाही….



